तीन मुलींच्या भाड्याच्या खोलीत छुपे कॅमेरे, लंपट घरमालकाला बेड्या

मुंबई: मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरी, शिक्षणानिमित्त पेईंग गेस्ट किंवा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुली-महिलांची संख्या अधिक आहे. मात्र याच भाड्यांच्या घरात, विशेषत: मुली राहत असलेल्या घरात सीसीटीव्ही लपवून ठेवला असेल तर? मुंबईत असाच एक प्रकार समोर आला आहे. तीन मुली राहत असलेल्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा लपवून ठेवणाऱ्या घरमालकाला डी बी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित मुली […]

तीन मुलींच्या भाड्याच्या खोलीत छुपे कॅमेरे, लंपट घरमालकाला बेड्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई: मुंबई-पुण्यासारख्या शहरात नोकरी, शिक्षणानिमित्त पेईंग गेस्ट किंवा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुली-महिलांची संख्या अधिक आहे. मात्र याच भाड्यांच्या घरात, विशेषत: मुली राहत असलेल्या घरात सीसीटीव्ही लपवून ठेवला असेल तर? मुंबईत असाच एक प्रकार समोर आला आहे. तीन मुली राहत असलेल्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा लपवून ठेवणाऱ्या घरमालकाला डी बी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित मुली दक्षिण मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून राहात होत्या. या खोलीत 47 वर्षीय घरमालकाने कथितरित्या सीसीटीव्ही कॅमेरे लपवून ठेवले होते.

या तीन मुली पेईंग गेस्ट म्हणून घरमालकाच्या 4 बेडरुम असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहात होत्या. घरमालकाने त्यामध्ये सीसीटीव्ही बसवले होते. काही दिवसांनी या मुलींच्या हे कॅमेरे निदर्शनास आलं. त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी 19 डिसेंबरला आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला. त्याला कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने 22 डिसेंबरला त्याची जामीनावर सुटका केली.

आरोपी घरमालक अविवाहित असून, तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. तो गिफ्ट बॉक्सचा व्यवसाय करतो. पोलिसांनी सर्व छुपे कॅमेरे जप्त केले आहेत. हे कॅमेरे आरोपीने त्याच्या मोबाईल चार्जरमध्ये लावले होते. त्यामध्ये त्याने मुलींचे अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत.

छुपे कॅमेरे कसे पकडले?

घरमालक आपल्या गप्पा चोरुन ऐकतो अशी शंका तक्रारदार मुलींना होती. त्यातच एका मुलीला आपल्या खोलीत इलेक्ट्रिक चार्जर मिळाला. त्यामुळे त्यांचा संशय आणखी बळावला. त्या मुलीने चार्जरवर कापड ठेवलं. त्यानंतर आरोपी तातडीने मुलींच्या खोलीत चेकिंगच्या बहाण्याने आला. त्याने मुलींना चार्जरवर कपडा का ठेवला याबाबत विचारणा केली. तसंच तो चार्जर टीव्ही अँटेना बुस्टर असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुलींनी त्या चार्जरचा फोटो काढून अधिक चौकशी केली असता, तो छुपा कॅमेरा असल्याचं उघड झालं. हे कॅमेरे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या प्रकारानंतर मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.