काही राजकीय पक्षांना ऊत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करणं टाळा, मुंबईच्या महापौरांचा सल्ला

विनाकारण लोकांचा जीव धोक्यात टाकू नका, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar Warn Mumbaikar on Corona Pandemic) 

काही राजकीय पक्षांना ऊत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करणं टाळा, मुंबईच्या महापौरांचा सल्ला
mayor kishori pednekar
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 4:48 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय पक्ष गर्दी जमवून आंदोलन करत आहेत. हे थोडं टाळलं पाहिजे, असा सल्ला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला. काही राजकीय पक्षांना ऊत आला आहे. ते गर्दी जमवून आंदोलन करत आहेत. मात्र हे टाळलं पाहिजे. विनाकारण लोकांचा जीव धोक्यात टाकू नका, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar Warn Mumbaikar on Corona Pandemic)

मुंबईत दिवाळीनंतर गर्दी वाढली होती. सर्व काही अनलॉक झालं होतं. मंदिर खुली करण्यात आली होती. त्यामुळे आकड्यात बदल होईल याची आम्हाला माहिती होती. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 300 वर गेला होता. तो आता कमी झाला असल्याने ही चिंतेची बाब आहे, असेही मुंबईच्या महापौर म्हणाल्या.

त्यामुळे मुंबईकरांनी अजून काळजी घेतली पाहिजे. जे नियम आहेत ते पाळले पाहिजे. काही राजकीय पक्षांना ऊत आला आहे. ते गर्दी जमवून आंदोलन करत आहेत. हे थोडं टाळलं पाहिजे, लोकांचा जीव धोक्यात टाकू नका. अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

दरम्यान मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्ण दुप्पटीचा 300 दिवसांवर गेलेला कालावधी कमी झाला.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी 196 दिवसांपर्यंत खाली आला आहे. गेल्या दहा दिवसात हा कालावधी 100 दिवसांनी कमी झाला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत 1 हजार 63 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 जणांचा मृत्यू झाला.(Mumbai Mayor Kishori Pednekar Warn Mumbaikar on Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

सीएसएमटी स्टेशनबाहेरील ‘तो’ पूल पुन्हा बांधणार, सहा महिन्यात पूल खुला करण्याचा प्रयत्न

मुंबईत आजारांमध्ये लक्षणीय घट, हेपटायटिस आणि ग्रॅस्ट्रो रुग्णांची संख्या घटली

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.