सरकार मेट्रो 3 चं कारशेड रॉयल पामजवळ हलवणार?

मुंबई मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीत प्रस्तावित मेट्रो कारशेडला ठाकरे सरकारने स्थगिती (Metro car shed new place)  दिली.

सरकार मेट्रो 3 चं कारशेड रॉयल पामजवळ हलवणार?
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 11:50 PM

मुंबई : मुंबई मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीत प्रस्तावित मेट्रो कारशेडला ठाकरे सरकारने स्थगिती (Metro car shed new place)  दिली. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली होती. यामुळे मेट्रो 3 चं कारशेड अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आरेतील मेट्रो कारशेडचा प्रकल्प आरेच्या परिसरातच असलेल्या रॉयल पाम या खाजगी विकासकाच्या जमिनीवर नेणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र यामुळे आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा विरोध खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी केला गेला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-3 चं कारशेड आता 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. एकीकडे रॉयल पाम आपली जमिनी कारशेडसाठी देण्याच्या बदल्यात शासनाकडून वाढीव एफएसआयची मागणी करत आहे. त्यामुळे, आरे बचावच्या घोषणेपाठीमागे खाजगी विकासकांचं अर्थकारण दडलंय का? असा प्रश्न समोर येत आहे. आरे करशेडला शिवसेनेचा विरोध हा केवळ देखावा आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

आरेतील वृक्ष तोडीला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जे काही करत आहेत ते पर्यावरण पूरक असेल. जे कोणी आरोप करत आहे. त्यांना काही काम नाही म्हणून आरोप केले जात आहेत. आरे कारशेड कुठे नेला जाणार आहे हे माहीत नाही. पण आम्ही मुंबईकरासाठी चांगलं काम करत आहोत अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

आरेतील कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामनं काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये मेट्रो कारशेडसाठी रॉयल पामचा विचार करण्यात यावा, असं लिहिण्यात आलं होतं. त्याशिवाय आणखी एक पत्र रॉयल पामनं आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या वनशक्ती या संस्थेलाही पाठवलं होतं. त्यामुळे रॉयल पाम या खाजगी विकासकाने मेट्रो कारशेडसाठी 30 ते 60 एकर जागा देण्याची तयारी दर्शविल्याने याबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या (Metro car shed new place) आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.