भाडेकरुंची संपूर्ण माहिती पोलिसांना द्या, आयुक्तांचे आदेश

मुंबईत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावी, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत.

भाडेकरुंची संपूर्ण माहिती पोलिसांना द्या, आयुक्तांचे आदेश
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 7:45 PM

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावी, असे निर्देश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिले आहेत (Mumbai Police). त्यानुसार, आता मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या भाडेकरुंची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. दहशतवादी घटना आणि असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा, सुव्यवस्थेला धोका पोहोचू नये, यासाठी या सूचना करण्यात आल्या आहेत (Mumbai Police).

दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहचण्याच्या शक्यतेला गृहीत धरुन कलम 144 च्या अधिकारानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 10 (2) कलम जारी केले आहे. त्यानुसार, भाडेकरु ठेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही घरमालकाने संबंधित भाडेकरुची संपूर्ण माहिती हद्दीतील पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय आपले घर भाड्याने देऊ नये. तसेच, भाडेकरुनेही आपली माहिती विहीत नमुन्यात पोलीस ठाण्यास द्यावी. मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्यांनीही याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे, अशी सूचना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने केली आहे.

विदेशी नागरिकाला भाडेकरु म्हणून ठेवायचे असेल, तर संबंधित विदेशी नागरिकाचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट क्र., पासपोर्ट दिल्याचे ठिकाण आणि तारीख, पासपोर्ट वैधतेची मुदत, व्हिजा क्र., वर्गवारी, दिल्याचे ठिकाण आणि तारीख, व्हिजा वैधतेची मुदत आदी माहिती सादर करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असंही या आदेशात नमुद करण्यात आलं आहे. ही माहिती बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रका द्वारे कळविण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.