Mumbai Local Live Update | मध्य रेल्वेवर खोळंबा, पश्चिम रेल्वेवर स्लो मार्ग ठप्प

मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत आहे.

Mumbai Local Live Update | मध्य रेल्वेवर खोळंबा, पश्चिम रेल्वेवर स्लो मार्ग ठप्प
Follow us
| Updated on: Sep 04, 2019 | 3:55 PM

मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर (Mumbai Rain) वाढल्यामुळे लोकल रेल्वे (Mumbai Local) वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे, तर पश्चिम रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

? पश्चिम रेल्वे माहीम-माटुंगादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची वाहतूक पुढील दोन तास बंद. अंधेरी ते वसईदरम्यान रेल्वेची वाहतूक चारही मार्गिकांवर धीम्या गतीने. नालासोपारा रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने वसई ते विरार दरम्यान वाहतूक ठप्प.

? मध्य रेल्वे मुंबईतील मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प, ठाणे ते कसारा/कर्जत/खोपोली धीम्या गतीने.

? हार्बर रेल्वे सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते अंधेरी/गोरेगाव रेल्वे सेवा बंद, वडाळा-मानखुर्द रेल्वेसेवाही खंडित. मानखुर्द ते पनवेल, ठाणे ते वाशी/पनवेल, नेरुळ- खारकोपर वाहतूक धीम्या गतीने सुरु.

[svt-event title=”वसई-चर्चगेट दरम्यान स्लो वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,2:52PM” class=”svt-cd-green” ] चर्चगेट ते वसई दरम्यान फास्ट मार्गावरील वाहतूक सुरु, मात्र माटुंगा रोड स्थानकाजवळ पाणी साचल्याने स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा, अनेक जण ट्रेनमध्ये बसून [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेवर लोकल वाहतुकीचा खोळंबा ” date=”04/09/2019,2:59PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प, सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते अंधेरी, सीएसएमटी ते गोरेगाव, वडाळा ते मानखुर्द हार्बर रेल्वे ठप्प, मानखुर्द ते पनवेल, ठाणे ते वाशी, ठाणे ते पनवेल, ठाणे ते कसारा/ कर्जत/ खोपोली ही रेल्वे सेवा सुरळीत [/svt-event]

नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वसई-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प.

मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात पाऊस सुरु आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासह मुंबई आणि परिसरात वरुणराजाचंही पुनरागमन झालेलं आहे.

माटुंगा-सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील जलद वाहतूक ठप्प आहे.

विक्रोळी- कांजूरमार्ग, कुर्ला स्टेशनजवळ पाणी साचल्यामुळे अप आणि डाऊन तसेच स्लो आणि फास्ट, तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. ठाणे ते कर्जत/कसारा दरम्यान वाहतूक सुरु आहे.

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. सीएसएमटी आणि अंधेरी/गोरेगाव दरम्यान वाहतूक सुरु आहे. तर वाशी-पनवेल दरम्यान ट्रान्सहार्बरही सुरळीत आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र पावसाची तीव्रता वाढल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे बेस्ट बेसच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे पाणी साचून मुंबईतील बऱ्याचशा मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबई पोलिसांनी

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.