VIDEO : हॉर्न वाजवाल, तर सिग्नलवरच थांबाल, मुंबई ट्राफिक पोलिसांची नवी युक्ती

लाल सिग्नलवरही मुंबईकर हॉर्न वाजवणं थांबवत नाहीत. या समस्येवर मुंबई पोलिसांनी चांगलीच नामी युक्ती शोधून काढली (Mumbai traffic police new idea for no honking) आहे.

VIDEO : हॉर्न वाजवाल, तर सिग्नलवरच थांबाल, मुंबई ट्राफिक पोलिसांची नवी युक्ती
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 11:41 PM

मुंबई : सकाळ, दुपार, संध्याकाळ अगदी पूर्ण वेळ गजबजलेलं शहर म्हणजे मुंबई. वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण या सगळ्याचीच अतिशयोक्ती. त्यामुळे कदाचित मुंबईला वाहतूक कोंडी आणि वाहतुकीमुळे प्रदूषणाची राजधानी संबोधलं (Mumbai traffic police new idea for no honking) जातं. या सगळ्याची मुंबईतील वाहन चालकांना इतकी सवय झाली आहे की, लाल सिग्नलवरही मुंबईकर हॉर्न वाजवणं थांबवत नाहीत. या समस्येवर मुंबई पोलिसांनी चांगलीच नामी युक्ती शोधून काढली आहे.

मुंबई पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक ठिकाणच्या ट्राफिक सिग्नलवर चौकोनी आकाराचे डेसिबल मीटर बसवले जाणार आहेत. या नव्या मीटरमुळे जर सिग्नल रेड असताना तुम्ही गाडीचा हॉर्न वाजवला, तर त्या हॉर्नच्या ध्वनी तीव्रतेची नोंद या मीटरमध्ये होईल. त्यानंतर अवघ्या काही सेंकदाच समोरील सिग्नल पुन्हा रिसेट होईल.

यामुळे तुम्ही जितक्या जास्त वेळा हॉर्न वाजवणार, तितक्या वेळा तो रेड सिग्नल पुन्हा पुन्हा रिसेट होणार आणि तितका वेळ तुम्हाला तुमच्यासोबत इतरांनाही त्या सिग्नलवर ताटकळत उभं राहावं लागणार, असा हा नवा फंडा मुंबई पोलिसांनी शोधून काढला आहे.

याबाबतचा एक व्हिडीओही मुंबई पोलिसांच्या वतीने शेअर करण्यात आला आहे. उगा कशाला हॉर्न वाजवी..काना येईल बहिरेपणा..वृद्ध, बालक अन् कुणी आजारी..फिकीर त्यांची करा जरा..असे या व्हिडीओवर म्हटलं आहे.

त्यामुळे आता सर्वच मुंबईकरांनी सिग्नलसारखा रिसेट होऊ द्यायचा आणि ताटकळत तिथेच उभं राहायचं. की लगेच आपल्या इच्छित स्थळी लवकरात लवकर पोहोचायचं याचा विचार करावा, असेही मुंबई पोलिसांतर्फे सांगितले जात (Mumbai traffic police new idea for no honking)  आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.