कोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी

विद्यमान कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आला असताना त्यांना कालावधी वाढवून ही रक्कम खर्च करण्यात आल्याने पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोरोना काळात मुंबईकरांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप केला जात आहे.

कोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी

मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये मुंबईतील सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने, बगीचे, क्रीडांगणे बंद होती. याच कालावधीत उद्यान व मैदानांच्या देखभाल व दुरुस्तीवर तब्बल 22 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे विद्यमान कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आला असताना त्यांना कालावधी वाढवून ही रक्कम खर्च करण्यात आल्याने पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोरोना काळात मुंबईकरांच्या पैशांची लूट केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रस्तावावरून स्थायी समितीत गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Municipal Corporation wastes Rs 22 crore on parks )

मुंबईतील 24 विभागांतील महापालिकेची उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे इत्यादी जागेचा विकास व देखभालीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. जानेवारी 2017 रोजी 24 विभागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली. या तीन वर्षांसाठी 180 कोटी 68 लाख रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. हा कालावधी 31 मार्च 2020 रोजी संपुष्टात आला. मात्र, या कंत्राटदारांशी उद्यान विभागांच्या अधिकार्‍यांशी साटेलोटे असल्याने त्यांनी याची निविदा काढण्यास विलंब केला. परिणामी कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पुढील निविदा प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे जुन्याच कंत्राटदारांकडून पुढील कामे करून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

खरं तर 23 मार्चपासून सप्टेंबर 2020 पर्यंत मुंबईतील उद्याने व मैदाने ही नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या उद्यान व मैदानांमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. परंतु याच लॉकडाऊनच्या काळात मैदान व उद्यानांसह वाहतूक बेटांवर 21 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. महापालिकेने या कंत्राटदारांना 180 कोटी 68 लाख रुपयांचे कंत्राट दिलेले असताना त्याच कंत्राटदारांना सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे या वाढीव कालावधीत 21 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, कंत्राटदारांना ही वाढीव रक्कम देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या ‘प्रगती पुस्तकात’ घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक

सावधान ! विनामास्क आढळल्यास मुंबई महापालिका पोलिसांच्या मदतीनं कारवाई करणार

Municipal Corporation wastes Rs 22 crore on parks

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *