गणेशोत्सवात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प करा, पंतप्रधान मोदींचं मुंबईकरांना आवाहन

मोदींनी मुंबईकरांना गणेशोत्सवानिमित्त प्लास्टिकमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. 

गणेशोत्सवात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प करा, पंतप्रधान मोदींचं मुंबईकरांना आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.  मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. माझा लहान भाऊ उद्धव ठाकरे असा उल्लेख मोदींनी केला. नमस्कर मुंबईकर…गणपती बाप्पा मोरया. गणेश उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, अशा मराठीत शुभेच्छा मोदींनी दिल्या.

यावेळी मोदींनी मुंबईकरांना गणेशोत्सवानिमित्त प्लास्टिकमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन केलं.

“मला गर्व आहे मी जेव्हा उत्तराखंडचा प्रभारी होतो, तेव्हा राज्यपाल कोशियारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असे. लहरी वातावरणमध्ये एवढ्या मोठया संख्येने आपण आज आलात आपले आभार, हे वेगळे संकेतही. कठीण परिस्थितीत काम करणे हे इस्रोच्या शास्त्रज्ञाकडून शिकावे. इस्रोमध्ये काम करणारे लोक हे लक्ष्य गाठूनच गप्प बसतात. ते थांबणार नाहीत जोपर्यंत ध्येय गाठत नाहीत. मी मुंबईकरांचे स्पिरीट ऐकले, आज इस्रोचे स्पिरीट बघितले”, असं मोदी म्हणाले.

मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या लोकांना शुभेच्छा, कारण 20 हजार कोटींपेक्षा जास्त काम सुरु होत आहे. या योजनांमुळे पायाभूत सुविधांना आधार मिळेल. त्यामुळे लोकांचे जीवन सुसह्य होईल. या सगळ्या योजनांबद्दल सर्वांचं अभिनंदन, असं मोदींनी सांगितलं.

मुंबईच्या गतीने देशाला गती दिली. गर्वाने, अभिमानाने तुम्ही म्हणता मी मुंबईकर. गेल्या 5 वर्षात फडणवीस सरकारने चांगले काम केले. प्रकल्पासाठी प्रयत्न केले ते मी पाहिले, असं म्हणत मोदींनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

सरकार 100 लाख कोटी रुपये आधुनिक सुविधांवर खर्च करणार आहे. त्यांचा फायदा मुंबई आणि महाराष्ट्राला होईल, असं आश्वासन मोदींनी दिलं.

मुंबईत आता फक्त 11 किमीचे मेट्रो नेटवर्क आहे. पण 2020 पर्यंत मेट्रोचं जाळं सव्वा तीनशे किमीपेक्षा जास्त असेल. मुंबईत मेट्रोने 10 हजार इंजिनिअर 40 हजार अन्य रोजगार उपलब्ध होतील. आज ज्या स्केलवर काम होत आहे ते यापूर्वी कधी झालं नाही. कधी विचार केला होता नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर, बुलेट ट्रेन प्रत्यक्षात येईल ? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला.

एक भारत, श्रेष्ठ भारत या ध्येयानेच आपण पुढे चालू. तुमच्या आशीर्वादाने जे नवे सरकार आले ते देशाला मजबूत आणि सुरक्षित करेल. एक नवा संकल्प जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त संधीबाबत अवगत करणे. संकल्प देश हितासाठी करावा, तो पूर्ण करण्यासाठी मागे हटू नका. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक संकल्प करा, बाप्पा विसर्जनावेळी प्लास्टिक जे जल प्रदूषण वाढवते ते टाळा. मिठी आणि अन्य नद्या, तसेच समुद्र प्लास्टिक मुक्त करा, असं आवाहन मोदींनी केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *