नवी मुंबईत एकाच दिवशी पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 79 नवे रुग्ण

एकाच दिवसात पाच जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागल्याने नवी मुंबईतील मृतांचा आकडा 59 वर गेला आहे. (Navi Mumbai Corona Patients Death)

नवी मुंबईत एकाच दिवशी पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 79 नवे रुग्ण

नवी मुंबई : नवी मुंबईत एकाच दिवशी पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत कालच्या दिवसात (27 मे) 79 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1853 वर पोहचली आहे. (Navi Mumbai Corona Patients Death)

एकाच दिवसात पाच जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागल्याने मृतांचा आकडा 59 वर गेला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरातही चिंता वाढली आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत 1864 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 जण बाहेरचे रहिवासी आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे कालच्या दिवसात 38 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 840 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

नवी मुंबईत आतापर्यंत 10 हजार 773 जणांची कोविड19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 8 हजार 21 जण निगेटीव्ह आले आहेत, तर 899 जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षित आहेत.

हेही वाचा : नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच

आतापर्यंत एपीएमसी संबंधित 590 कोरोना रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली सानपाडा परिसरातील आहेत. एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये दोघा जणांना कोरोना झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. एपीएमसीमुळे नवी मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

(Navi Mumbai Corona Patients Death)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *