उरण पूल दहशतवादी मजकूर : आरोपीचं नेपाळ कनेक्शन, तीन मोबाईल फेकले

आमीर उल्लाहच्या तपासामध्ये नवी माहिती समोर येत आहे. त्याचे फोन कॉल तपासले असता आमीर शेखने आपल्या मोबाईलवरुन नेपाळमध्ये फोन केल्याचे आणि तिथून त्याला फोन आल्याचं समोर आलं आहे.

उरण पूल दहशतवादी मजकूर : आरोपीचं नेपाळ कनेक्शन, तीन मोबाईल फेकले
Follow us
| Updated on: Jun 13, 2019 | 11:03 AM

नवी मुंबई : उरणमधील खोपटा पुलावर दहशतवादी मजकूर लिहलेला आरोपी आमीर उल्लाह शेखची पोलीस कोठडी उरण कोर्टाने 17 जूनपर्यंत वाढवली आहे. आमीर उल्लाह हा याअगोदर सात दिवस पोलीस कोठडी होता. आमीर उल्लाहच्या तपासात त्याचं नेपाळ कनेक्शन समोर येत आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी उरण कोर्टात रिमांडसाठी अपील केलं होतं.  आरोपी आमीर उल्लाह शेखकडून एक मोबाईल फोन आणि मार्कर पेन हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडील आणखी दोन मोबाईलची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी त्याची कोठडी वाढवून देण्याची विनंती कोर्टाकडे केली.

नेपाळ कनेक्शन?

आमीर उल्लाहच्या तपासामध्ये नवी माहिती समोर येत आहे. त्याचे फोन कॉल तपासले असता आमीर शेखने आपल्या मोबाईलवरुन नेपाळमध्ये फोन केल्याचे आणि तिथून त्याला फोन आल्याचं समोर आलं आहे. त्याचीही चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली.

आणखी एक बाब म्हणजे घटनास्थळी एक लहान होडी होती. ज्या होडीचं वर्णन आमीरने पुलावर लिहलेल्या मजकुरावर मिळत आहे. त्या अनुषंगाने आमीर कोडवर्डद्वारे काही संदेश देत आहे का, असा संशय पोलिसांना आहे.

आमीरने लिहिलेल्या मॅसेजमध्ये “दुनिया और पूरा कैनात हमारे लिए छोटी नाव है,जिस नाव में बैठकर मछली पकड़ती हो और उसी नाव में बैठकर खुदा की खुदाई को ललकारे हो. जहाज,पोर्ट,एयरपोर्ट, गोवा, एक्सपोर्ट-इम्पोर्ट ,गैस पाइपलाइन” असा उल्लेख आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमीरची खोठडी 5 दिवस वाढवून देण्याची मागणी कोर्टाला केली, ती मान्य करण्यात आली.

डिटेल्स मागवले

आमीरने दहशतवादी कारवायांसाठी कोडवर्ड लिहिले का याचा तपास सुरु आहे. शिवाय आमीरच्या खात्यांची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याचे बँक डिटेल्स मागवले आहेत. सध्या उरण पोलिसांसह आयबी, सीआयडी, एटीएस आणि NIA ची टीम आमीरची चौकशी करत आहेत.

आमीर उल्लाह शेखला अटक

उरणच्या खोपटा पुलावर वादग्रस्त मजकूर लिहिल्याचं समोर आलं होतं. वादग्रस्त मजकूर लिहून दहशत पसरवल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आमीर उल्लाहशेख या आरोपीला बेड्या ठोकल्या. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थ नगरचा राहणारा आहे. तो गेली 10 वर्षे खोपटा येथे आपल्या तीन भावांसोबत भाडेतत्वावर राहतो. तो एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतो.

मनोरुग्ण असल्याची बतावणी

दरम्यान, आमीरने आपण मनोरुग्ण असल्याची बतावणी केली. मात्र पोलिसांच्या तपासात तो मेंटली फिट असल्याचं समोर आलं. त्याच्या कुटुंबीयांकडून त्याचा कोणताही वैद्यकीय अहवाल मिळाला नाही. आमीरकडे एकूण 3 मोबाईल होते. हे सर्व मोबाईल त्याने तोडून फेकून दिले.

मोबाईल फेकले

खोपटा  पुलावर आक्षेपार्ह मजकूर लिहण्यापूर्वी जे मोबाईल त्याच्याकडे होते ते त्याने फेकून दिले. तो मजकूर लिहल्यानंतर एक मोबाईल तोडून टाकला. ज्यावेळी खोपटा पुलाची  बातमी सगळीकडे पसरली तेव्हा त्याने तिसरा फोन तोडून फेकून दिला.

पुलावर मजूकर काय?

उरणमधील खोपटा उड्डाणपुलावर आयसीस या दहशतवादी संघटनेचा आणि त्या संघटनेचा म्होरक्या अबू अल बगदादी यांचा उल्लेख आढळल्यानं खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर अनेक चित्रांमध्ये जेएनपीटी जहाज, विमानतळ, पेट्रोलपंप दाखवण्यात आले होते. लिहिलेला संदेश हा देवनागरी आणि इंग्रजी भाषेत होता. त्यात धोनी, आम आदमी पार्टी, केजरीवाल, हाफिज सईदसोबत कुर्ला, गोरखपूर या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला होता.

आरोपी आमीर उल्लाह शेखने हा संदेश का आणि कशासाठी लिहिला याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या आरोपीकडून आणखी काही धागेदोरे मिळतात का याबाबत तपास केला जात आहे.

संबंधित बातम्या 

उरणमध्ये दहशतवादी मजकूर लिहिणाऱ्या तरुणाकडे 3 मोबाईल, मनोरुग्ण असल्याचा बनाव?   

उरणच्या खोपटा पुलावर संशयित मजकूर, इसिस, बगदादीचाही उल्लेख   

रायगडमध्ये पुलाच्या खांबावर संशयास्पद मजकूर, हाफिज सईदचा उल्लेख 

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.