गणेशोत्सवात सुप्रिया सुळेंच्या मार्गात विघ्न, दादर स्टेशनवर टॅक्सी एजंटने वाट अडवली

दादर स्टेशनवर टॅक्सी एजंटने त्रास दिल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर केली आहे. रेल्वेमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली आहे

गणेशोत्सवात सुप्रिया सुळेंच्या मार्गात विघ्न, दादर स्टेशनवर टॅक्सी एजंटने वाट अडवली

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule on Taxi Tout) यांनी मुंबईतील दादर स्टेशनवर टॅक्सीवाल्याकडून आलेल्या विचित्र अनुभवाविषयी रेल्वेमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. टॅक्सीवाल्याने ट्रेनमध्ये आपल्यासमोर उच्छाद मांडल्याची तक्रार (Supriya Sule on Taxi Tout) सुळेंनी ट्विटरवरुन केली आहे.

‘दादर रेल्वे स्थानकावर मला एक विचित्र अनुभव आला. कुलजीत सिंह मल्होत्रा असं स्वतःचं नाव सांगणारा माणूस ट्रेनमध्ये शिरला. टॅक्सी सेवेसाठी तो दलाली करत होता. दोन वेळा नकार देऊनही त्याने माझा रस्ता अडवला. इतकंच नाही, तर निर्लज्जपणे माझ्यासोबत फोटोसाठी पोझही देत होता’ अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

‘रेल्वेमंत्र्यांनी कृपया या प्रकरणात लक्ष घालावं, म्हणजे प्रवाशांना असा अनुभव पुन्हा येता कामा नये. जर दलाली कायदेशीर असेल, तर रेल्वे स्थानकं, विमानतळ यांच्यावर दलालीला परवानगी नसावी. केवळ नेमलेल्या टॅक्सी स्टँडवरच एजंटना संमती द्यावी’ अशी मागणी सुप्रिया सुळेंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे ट्विटरवरुन केली आहे.

‘या घटनेविषयी दादर रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित एजंटला पकडून दंड वसूल केला. तशा प्रकारचा मेसेज आरपीएफ पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. तात्काळ कारवाईबद्दल रेल्वे पोलिसांचे आभार. कुठल्याही रेल्वे प्रवाशाची गैरसोय होता कामा नये’ अशी इच्छाही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *