बीएमसीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला निमंत्रण नाही, काँग्रेसच्या गोटातून प्रभाग समिती निवडणुकीत बहिष्काराचा विचार

बीएमसीच्या हेरिटेज वॉकला सामंजस्य करार कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे.

बीएमसीच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला निमंत्रण नाही, काँग्रेसच्या गोटातून प्रभाग समिती निवडणुकीत बहिष्काराचा विचार
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 11:34 PM

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी होत असताना मुंबई महानगरपालिकेत मात्र काही कुरबुरी होताना दिसत आहे. आज (13 ऑक्टोबर) मुंबई मुख्यालय इमारतीत पर्यटकांच्या हेरिटेज वॉकला परवानगी देणारा सामंजस्य कराराचा कार्यक्रम झाला. मात्र या कार्यक्रमात पालिकेतील राजकिय पक्षांचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते यांना निमंत्रण नसल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे. बीएमसीत महाविकासआघाडीच्या धर्माला फाटा दिल्याने काँग्रेसच्या गोटात चांगलीच नाराजी आहे (No invitation to Congress leader in BMC for Guided Heritage Walk program).

काँग्रेसकडे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद आहे. असं असतानाही शिवसेनेने पालिकेतील अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाला न बोलावल्यानं काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. त्यामुळे बुधवारी (14 ऑक्टोबर) होणाऱ्या प्रभाग समिती निवडणुकीत काँग्रेसकडून बहिष्कार टाकण्याचा विचार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास काँग्रेसची ही नाराजी प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेला महागात पडू शकते.

काँग्रेसने राज्यातील महाविकास आघाडीचा धर्म पाळत बीएमसीच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र, या नाराजी नाट्यानंतर बुधवारपासून होणाऱ्या प्रभाग समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपली भूमिका बदलल्यास शिवसेनेची अडचण होणार आहे. शिवसेनेला प्रभाग समित्यांमध्ये वर्चस्व कायम राखायचे असेल, तर काँग्रेसची मदत घ्यावीच लागणार आहे. मात्र, ऐन वेळेवर काँग्रेसची नाराजी आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत महापालिका आणि एमटीडीसीमध्ये सामंजस्य करार

बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला. राज्याचे पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात संपन्न झाला.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई महापालिकेची इमारत ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर या इमारतीचे स्थापत्य, त्यातील तैलचित्रे, पुतळे यांचेही एक वेगळे महत्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिले पाहिजेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आवर्जुन पहावी अशी ही वास्तू आहे. मुंबईला 24 तास कार्यरत ठेवणारे महापालिका प्रशासन कसे काम करते हे पाहणे वेगळा अनुभव देणारे आहे.”

“मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता 70 वरुन फक्त 9 या एकअंकी संख्येवर आणली आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “वानखेडे स्टेडीअमच्या हेरीटेज वॉकसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर एकाच आठवड्यात महापालिका इमारतीच्या हेरीटेज वॉकसाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या करारामुळे मुंबईच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी चालवणारी मुंबई महापालिका कसे काम करते हे पाहणे पर्यटकांसाठी निश्चितच आनंददायी असेल.”

“ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्वाच्या असलेल्या महापालिका इमारतीत काम करण्याची संधी माझ्यासाठी बहुमोल ठरली. पर्यटकांसह सामान्य मुंबईकरांनाही या इमारतीबाबत मोठे आकर्षण आहे. महापालिका प्रशासन कसे चालते याबाबत सामान्यांना नेहमीच आकर्षण असते. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पर्यटकांसह मुंबईकरांनाही आता ही इमारत पाहण्याची संधी मिळणार आहे,” असं मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

आधी मनसुबे उधळले, आता भाजपला मुंबई मनपातून हद्दपार करण्याचा महाविकास आघाडीचा चंग

BMC Committee Election | दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा

काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच

No invitation to Congress leader in BMC for Guided Heritage Walk program

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.