मनसेबाबत आता काँग्रेसने भूमिका घ्यावी: नवाब मलिक

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह दिग्गज नेत्यांनी त्याबाबत जाहीर भूमिका घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मनसेच्या बाजूनेच निर्णय घेण्याचं आवाहन काँग्रेसला केलं आहे. नवाब मलिक म्हणाले, “मनसेला मानणारा एक वर्ग आहे. आमची आजही मनसे सोबत …

मनसेबाबत आता काँग्रेसने भूमिका घ्यावी: नवाब मलिक

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह दिग्गज नेत्यांनी त्याबाबत जाहीर भूमिका घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मनसेच्या बाजूनेच निर्णय घेण्याचं आवाहन काँग्रेसला केलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, “मनसेला मानणारा एक वर्ग आहे. आमची आजही मनसे सोबत असावी अशी भूमिका आहे. मनसे ही सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिका घेते. काँग्रेसने आता भूमिका घ्यावी”

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मनसेच्या बाजूने असल्याने आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा: काँग्रेसला चंद्राबाबू चालतात, मग राज ठाकरे का नको? : अजित पवार

सुजय विखेंचा निर्णय अद्याप नाही

दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांनी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतही भाष्य केलं.

सुजय विखे यांना पक्षात घेण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. नगरच्या जागेचा कुठलाही मुद्दा नाही. आघाडीत जे ठरतं त्यानुसार जागावाटप होतं, असं नवाब मलिक म्हणाले.

पुलवामा हल्ल्याबाबत

मुंबईवर 26/11 हल्ला झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर राजीनामा कुणी दिला हे सांगा. कोणी जबाबदारी घेणार आहे की नाही. फक्त राजकारण केलं जात आहे. आम्हाला यावर राजकारण करायचं नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या

एकत्र या, भाजप नावाची आपत्ती घालवली पाहिजे : पवार  

एअर स्ट्राईकमधील मृतांचा नेमका आकडा सांगा: शरद पवार 

युद्ध हवं की नको, राज ठाकरेंकडून मोदींना मोठा पर्याय 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *