'आता बघाच तो व्हिडीओ', भाजपचं मनसेच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ला उत्तर

मुंबई: मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपने ‘आता बघाच तो व्हिडीओ’ने उत्तर दिलं. भाजपने मुंबईतील रंगशारदा सभागृहात जाहीर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या व्हिडीओचा उद्देश सांगितला. “सत्याच्या आधारावर राजकारण करणं ही आमची संस्कृती आहे. असत्य, अर्धवट माहितीच्या आधारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करत आहेत. टीकेचं स्वागत …

'आता बघाच तो व्हिडीओ', भाजपचं मनसेच्या 'लाव रे तो व्हिडीओ'ला उत्तर

मुंबई: मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपने ‘आता बघाच तो व्हिडीओ’ने उत्तर दिलं. भाजपने मुंबईतील रंगशारदा सभागृहात जाहीर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या व्हिडीओचा उद्देश सांगितला. “सत्याच्या आधारावर राजकारण करणं ही आमची संस्कृती आहे. असत्य, अर्धवट माहितीच्या आधारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करत आहेत. टीकेचं स्वागत आहे, पण खोटं बोल पण रेटून बोल असं नको. मनसेकडून असत्य आणि अर्धवट गोष्टींचं मनसेकडून राजकारण सुरु आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

यावेळी भाजपकडून राज ठाकरे यांचे पूर्वीचे व्हिडीओ दाखवले. त्या व्हिडीओत राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान टीका केली होती. तो व्हिडीओ आशिष शेलारांनी दाखवला. शिवाय मोदींना राज ठाकरे हिटलर म्हणतात, पण राज ठाकरे यांचे कार्यकर्ते वृत्तवाहिन्यांवर बंदी घालतात, सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्यांना मारहाण करतात, मग तुम्ही कोण असा, सवाल शेलार यांनी राज ठाकरेंना विचारला.

LIVE UPDATE

  • जे इम्रान खान बोलतो, तेच राज ठाकरे कसे बोलतात, अजित डोवालांची चौकशीची मागणी पाकिस्तान करतंय, राज ठाकरेंचीही तीच मागणी कशी? – आशिष शेलार
  • जवान आणि किसान यांच्याबाबत मोदींचा मुलाखतीतील व्हिडीओ अर्धवट दाखवला, राज ठाकरे हे रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यातील अर्धवटरावाप्रमाणे तर नाहीत ना असा प्रश्न  – आशिष शेलार
  • नोटाबंदीच्या मुद्द्यावर कोणत्याही मुद्द्यावर कुठल्याही मंचावर जाहीर चर्चा करण्यास तयार – आशिष शेलार
  • नोटाबंदीमुळे अनेक बनावट कंपन्या बंद झाल्या, कर भरणाऱ्यांची संख्या वाढली – आशिष शेलार
  • नोटाबंदी घोटाळा कशी असू शकते? नोटाबंदीच्या परिणामांची चर्चा करायला आम्ही तयार- आशिष शेलार
  • पलटवार किंवा पर्सनल हल्ला नाही, प्रतिशोध किंवा प्रतिउत्तर नाही, आम्ही सत्य जनतेसमोर मांडणार आहोत  – आशिष शेलार
  • आपली बाजू मांडण्याचा आमचा प्रामणिक प्रयत्न,एका बाजूला चिखलफेक आणि एका बाजूला प्रगतीचा आलेख असे व्हिडीओ दाखवणार – आशिष शेलार
  • 32 खोटे दावे राज ठाकरेंनी केली – अशिष शेलार
  • 19 प्रकरणावर आम्ही बोलणार. वेळेची मर्यादा होती म्हणून आम्ही 32 प्रकऱणावर बोलणार नाही. असत्यावर बोलणं तुमची प्रकृती – आशिष शेलार

LIVE VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *