Corona | 60 वर्षांवरील रुग्णांवरच मोठ्या रुग्णालयात उपचार

मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सर्वाधिक 60 वर्षांवरील रुग्ण  (old age corona patient treatment in hospital) आहे.

Corona | 60 वर्षांवरील रुग्णांवरच मोठ्या रुग्णालयात उपचार
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 4:43 PM

मुंबई : मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सर्वाधिक 60 वर्षांवरील रुग्ण  (old age corona patient treatment in hospital) आहेत. त्यामुळे आता कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार आणि खासगी मोठ्या रुग्णालयातच उपचार करणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने (old age corona patient treatment in hospital) दिली आहे.

60 वर्षांखालील आणि लक्षणे नसलेल्या इतर रुग्णांवर मात्र मॅटरनीटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 278 झाला असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे 60 वर्षांवरील असून या रुग्णांना इतरही आजार असल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व सोयी असलेल्या कस्तुरबा, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, नानावटी, सैफी या रुग्णालयातच या रुग्णांवर उपचार करण्याचे एसओपीमध्ये सांगण्यात आले आहे.

60 वर्षाखालील आणि ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत अशा रूग्णांवर मॅटरनिटी होम बिल्डिंग नागपाडा, लिलावती हॉस्पिटलजवळचे मेटर्निटी होम, अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस, डायग्नोस्टिक सेंटर पंजाबी गल्ली, एमसीएमसीआर पवई, अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर, वांद्रे तलावासमोरील महात्मा गांधी हॉल या ठिकाणी उपचाराकरिता विलगीकरण (आयसोलेशन) सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.