मालाडमध्ये सिलेंडर स्फोटात घर उद्धवस्त, भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मालाड येथील एमएचबी वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे भिंत कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर 4 जण जखमी झाले आहे. मंजू आनंद (35) असे या मृत महिलेचे नाव आहे.

मालाडमध्ये सिलेंडर स्फोटात घर उद्धवस्त, भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबई : मालाड येथील एमएचबी वसाहतीत गॅस सिलेंडरचा (Malad Malwani Gas Cylinder Blast) स्फोट झाला आहे. यामुळे भिंत कोसळून (Walls collapsed) एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर 4 जण जखमी झाले आहे. मंजू आनंद (35) असे या मृत महिलेचे नाव आहे.

मालाडमधील मालवणी (Malad Malwani) पश्चिमेकडील एमएचबी कॉलनीतील (MHB Colony) चाळ क्रमांक 91 मध्ये ही दुर्घटना घडली. आज (1 ऑगस्ट) सकाळी 9 च्या सुमारास एका घरातील सिलेंडरचा स्फोट (Malad Malwani Gas Cylinder Blast) झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घरातील भिंतींना तडे गेलेत.

तसेच या स्फोटामुळे एक भिंतही कोसळल्याने मंजू आनंद या त्या ठिकाणी अडकल्या. यानंतर त्यांना तातडीने बाहेर काढून जवळच्या सामान्य प्रशासन या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर या सिलेंडर स्फोटात शीतल काटे (44), सिद्देश गोटे (19), ममता पवार (22), अश्विनी जाधव (26) हे चार जण जखमी झाले आहेत. यात ममता पवार ही 80 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तर अश्विनी जाधव ही तरुणही यात 15 टक्के भाजली असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर दोघांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *