क्विकरवरुन नोकर पुरवण्याचा बहाना; टोळी जेरबंद

मुंबई : जगभरात ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर झपाट्याने वाढतो आहे. आजकाल लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाईन हवं असतं. पण या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन गुन्ह्यांमध्येही वाढ होत चालली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले आहे. क्विकर डॉट कॉम या नामवंत ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक झाल्याचं विरारमध्ये उघड झालं. विरारच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या …

क्विकरवरुन नोकर पुरवण्याचा बहाना; टोळी जेरबंद

मुंबई : जगभरात ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर झपाट्याने वाढतो आहे. आजकाल लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाईन हवं असतं. पण या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन गुन्ह्यांमध्येही वाढ होत चालली आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले आहे.

क्विकर डॉट कॉम या नामवंत ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक झाल्याचं विरारमध्ये उघड झालं. विरारच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने या टोळीचा भांडाफोड केला. घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ विश्वासू नोकर देण्याचे आमिष दाखवून, भारतातल्या विविध राज्यातील शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक या टोळीने आतापर्यंत केली आहे.

कानपूर, हैदराबाद, बंगळुरु, नवी दिल्ली, नागपूर, पुणे, शिमला, वाराणसी यांसह इतर राज्यातील दीडशेहून अधिक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज जयप्रकाश सक्सेना (वय 26) आणि अर्जुन सत्यनारायण नाईक (वय 27) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राज हा विरार ग्लोबल सिटी येथील, तर अर्जुन हा सांताक्रूझचा राहणारा आहे. या दोघांनी आयकॉन मेड सर्व्हिस आणि समर्थ इंटरप्राइजेस नावाच्या दोन कंपनीचे 2 महिन्यांसाठी 35 हजार रुपये भरून क्विकर डॉट कॉम या अॅपवर वर नोंदणी केली होती. या नोंदणीच्या आधारे पूर्णवेळ घरकाम करण्यासाठी नोकर देण्यात येईल, अशी जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या आधारे नोकर देण्याचे आमिष देऊन ते लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करत होते.

सध्या हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *