‘त्यांनी आधी आपापसांत संवाद साधावा, मग आम्हाला बोलवावं’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही. त्यामुळे त्यांनी आधी आपसांत संवाद साधावा. मग आम्हाला बोलवावं.

'त्यांनी आधी आपापसांत संवाद साधावा, मग आम्हाला बोलवावं', फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात
Follow us
| Updated on: Feb 23, 2020 | 4:04 PM

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारकडून (BJP Boycotts Govt Tea Party) भाजपला चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, विरोधी पक्ष भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. “सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही. त्यामुळे त्यांनी आधी आपसांत संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी, सुसंवादासाठी बोलवावं. मुख्यमंत्र्याच्या चहा-पाण्याला जाण्याची आम्हाला गरज नाही”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra FadnavisBJP Devendra Fadnavis) यांनी लगावला. विरोध पक्ष भाजपची आज पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. या पत्रकार परिषदेला फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकार स्थापन झाल्यापासून जे काही काम काज पाहायला मिळालं (BJP Boycotts Govt Tea Party), त्यामध्ये असं दिसलं की सरकारला अजून दिशा गवसलेली नाही. सरकार अजूनही कन्फ्यूज्ड आहे. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी चहा पान करुन सुसंवाद साधायला पाहिजे आणि मग विरोधी पक्षांशी संवाद साधायला हवा. यांनी प्रत्येक निर्णयालाला घुमजाव केले आहे. कर्ज माफी नाही, तर कर्ज मुक्ती, अशी युक्ती केली आहे. दिशाभूल करण्याचं काम कर्ज माफीमध्ये सुरु आहे. या कर्ज माफीमध्येसुद्धा आधारच्या अकाउंटशी लिंक करायची आहे आणि मग अकाऊंट नंबर द्ययाचे आहेत. इतर माहिती द्ययाची आहे.”

“आपले सेवा केंद्रवर आम्ही व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती. तेव्हा आम्हला नाव ठेवत होते, मात्र आता ते सुद्धा हेच करत आहेत. आम्ही जी कर्ज माफी दिली होती, त्या पलीकडे हे सरकारे काही करत नाही. तूर खरेदी नीट पद्धतीने होत नाही. भात खरेदीमध्ये भ्रष्ट्राचार होत आहे. याबाबत केंद्र सरकारला आम्ही तक्रार करणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही लोकांचा पगडा दूर झाला पाहिजे आणि शेतकरऱ्याला पण मतदान करता आलं पाहिजे. या सरकार ने हा निर्णय बदलला आहे. तो मुद्दा ही आम्ही उचणार आहोत. महिला सुरक्षा चा प्रश्न उचलणार आहोत. जी संवेदनशीलता दिसली पाहिजे, ती दिसत नाही. कारण पोलीस विभागचं मनोधैर्य खचवलं जात आहे”, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

“मराठा वॉटर ग्रीड स्थगिती असो, राष्ट्रीय पेय जल योजनेला दिलेली स्थगिती असो, रस्त्यांना स्थगिती, जलयुक्त शिवार योजना गुंडाळली आहे. जी कारणं दिली जात आहे. हे योग्य नाही. ही एक वैज्ञानिक योजना आहे. या योजनेत थातूर मातूर बदल करुन हे तीच योजना पुन्हा आणतील. वर्क ऑर्डर होऊन देखील कामं थांबवली आहे”, असंही फडणवीसांनी म्हटलं.

“सीएए आणि एनपीआर बद्दल मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली, त्याच स्वागत आहे. शिवाजी महाराजांच्या अवमान होत आहे. सरकार काहीही बोलायला तयार नाही.खुर्ची साठी किती वेळ गप्प राहतील. वंशजांना पुरावे मागितले जात आहेत. काँग्रेस वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत आहे. मध्य प्रदेशातील ज्याप्रकारे सावरकरांचा अपमान झाला. हे ते सहन करणार असतील, तर त्यांनी करावे. मात्र, आम्ही आणि जनता सहन करणार नाही. 26 तारखेला सावरकरांचा गौरव झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे”, असा सल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

“हिंदू समाज सहिष्णू आहे. 100 कोटीवर 15 कोटी भारी, असं जर कोणी म्हणत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. एखाद्या मुस्लिम राज्यात जर कोणी असं म्हणाला असता, तर चाललं असत का? हिंदू समाजाचा अवमान कोणी करु नये. आम्ही ते सहन करणार नाही. आमची भूमिका टोकाची असेल (BJP Boycotts Govt Tea Party)”, असंही फडणवीस म्हणाले

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.