Panvel Corona | मुलांना शाळेत बोलावून पुस्तक वाटप, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, पनवेल महापालिकेच्या शाळेतील प्रकार

पनवेल परिसरातील शाळेकडून नियमाला बगल देत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे

Panvel Corona | मुलांना शाळेत बोलावून पुस्तक वाटप, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, पनवेल महापालिकेच्या शाळेतील प्रकार

पनवेल : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा (Panvel ZP School Violate Social Distance Rules) सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु, पनवेल परिसरातील शाळेकडून या नियमाला बगल देत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. गुरुवारी (9 जुलै) पनवेल महापालिका शाळा क्र. 2 हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुस्तकांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी केली होती. कोरोना संसर्ग काळात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळले जात असल्याचं या निमित्ताने पुढे आलं आहे (Panvel ZP School Violate Social Distance Rules).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पनवेल परिसर रेड झोनमध्ये येतो. दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीच्या जवळपास आहे. या अनुशंघाने पनवेल मनपा परिसरातील तसेच जि. प. शाळा अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करण्यासाठी शासन द्विधावस्थेत आहे.

कोरोनाच्या काळात विद्यर्थ्यांना शाळेत येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तरी सुद्धा पनवेल परिसरातील शाळेकडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

गुरुवारी पनवेल महापालिका क्र. शाळा 2 हुतात्मा हिवरे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेत सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करुन पुस्तके घेण्यास बोलवण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकाचे वितरण केले जाते. ही पुस्तके घेण्याकरीता पालक तसेच विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. सॅनिटायझरचाही उपयोग करण्यात आलेला नाही. या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना बोलवलेच कसे, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

या बाबत प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब चिंमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेरा समोर न येता आम्ही शासनाच्या नियमानुसार पुस्तक वाटप करत असल्याचे सांगितले. मात्र, यासाठी पालकांना बोलवण्यात आले असता त्यांच्यासोबत त्याची मुलंही आल्याचं त्यांनी सांगितले.

Panvel ZP School Violate Social Distance Rules

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या नावात बदल, मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा! यंदा शाळेची फीवाढ नाही, मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *