उंचीमुळं पुलाखाली अडकलेला परळचा महाराजा सुखरुप मार्गस्थ

मुंबईतील सर्व गणपती बाप्पा विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) मार्गस्थ झालेले असतानाच  परळचा महाराजा (Paral Maharaja) लालबाग (Lalbaug) येथील पुलाखाली अडकला.

उंचीमुळं पुलाखाली अडकलेला परळचा महाराजा सुखरुप मार्गस्थ

मुंबई : मुंबईतील सर्व गणपती बाप्पा विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) मार्गस्थ झालेले असतानाच  परळचा महाराजा (Paral Maharaja) लालबाग (Lalbaug) येथील पुलाखाली अडकला. विष्णूरुपात असलेल्या ही गणेशमूर्ती शेषनागावर विराजमान आहे. हीच शेषनागाची रचना अडथळा ठरली.

लालबागच्या पुलाखाली हा महाराजा अडकला होता. या अडथळ्यानंतर मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचाही विचार करण्यात आला. त्यामुळे मूर्तीची उंची लक्षात घेऊन त्यासाठी सोयीचा असा मार्ग निवडण्यावरही चर्चा झाली. यावेळी मूर्तीला कोणताही धक्का लागू नये म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक मार्ग बदलवला जाऊ नये यासाठी प्रयत्न केला.

मूर्तीची दिशा बदलल्यानंतर परळचा महाराजा मार्गस्थ

जवळपास 10 मिनिटं परळच्या महाराजाची मूर्ती लालबाग उड्डाणपुलाखाली अडकली. या मूर्तीची उंची 23 फुटांपेक्षा अधिक होती. त्यामुळेच पुलाखालून जाण्यास अडचण आली. अखेर गणेशभक्तांच्या अथक प्रयत्नानंतर मूर्तीची दिशा बदलण्यात यश आले आणि मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.

मूर्ती पुलाखालून जाताना अडकल्याने जवळपास 10 मिनिटे कार्यकर्ते चिंतेत पडले होते. अखेर मूर्ती सुखरुप मार्गस्थ झाल्यानंतर सर्वांनी गणरायाच्या घोषणा देत आणि टाळ्या वाजवत जल्लोष केला. यानंतर श्रॉफ बिल्डिंगने देखील मूर्तीवर पुष्पवृष्टी करत परळच्या महाराजाचं स्वागत केलं आणि मानवंदना दिली.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *