पेंग्विनमुळे राणीबागेतील पर्यटकांमध्ये वाढ

भायखळा येथील राणीबागेचे पूर्वी दोन ते पाच रुपये प्रवेश शुल्क होते. हे शुल्क वाढवून थेट शंभर रुपये करण्यात आले. तरीही पेंग्विनला पाहण्यासाठी बच्चेकंपनी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

पेंग्विनमुळे राणीबागेतील पर्यटकांमध्ये वाढ

मुंबई : भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांमध्ये गेल्या तीन वर्षात वाढ झाली आहे. पेंग्विनच्या आगमनानंतर (Penguin) या उद्यानात आतापर्यंत तब्बल 25 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत दहा कोटी रुपये उत्पन्न जमा झाले आहे.

भायखळा येथील राणीबागेचे पूर्वी दोन ते पाच रुपये प्रवेश शुल्क होते. हे शुल्क वाढवून थेट शंभर रुपये करण्यात आले. तरीही पेंग्विनला (Penguin) पाहण्यासाठी बच्चेकंपनी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मोठी कमाई होत आहे.

राणीच्या बागेत हॅम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन 26 जुलै 2016 रोजी आणण्यात आले. सध्या 7 पेंग्विन राणीबागेत उभारलेल्या विशेष काचघरातील तलावात विहार करीत आपल्या लीलांनी पर्यटकांना मोहित करत आहेत. पेंग्विन राणीबागेत आणल्यानंतर हळूहळू येथे पर्यटकांच्या गर्दीत वाढ होऊ लागली. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात 9 लाख 28 हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे बागेचे 3 कोटी 78 हजार रुपये उत्पन्न जमा झाले होते.

मात्र एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत पर्यटकांची संख्या 12 लाख 53 हजारांवर पोहोचली. त्यातून 5 कोटी 17 हजार रुपये तिजोरीत जमा झाले. तसेच एप्रिल 2019 ते जून 2019 या तीन महिन्यांत 1 लाख पर्यटक आणखी वाढले. यातून दीड कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले. जुलै महिन्यात मात्र 34 हजार 400 पर्यटक आले. त्यातून 15 लाख 67 हजार रुपये जमा झाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *