मला पोलिसांनी अटक केली, किरीट सोमय्यांचं ट्वीट

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya arrested) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

मला पोलिसांनी अटक केली, किरीट सोमय्यांचं ट्वीट
Follow us
| Updated on: Apr 08, 2020 | 1:16 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya arrested) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. “पोलिसांनी मला निवासस्थानावरुन (होम ऑफिस) निलमनगर, मुलुंड येथून ताब्यात घेऊन अटक केली. आता मला मुलुंड पूर्व येथील नवघर पोलीस ठाण्यात नेले आहे”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं. (Kirit Somaiya arrested)

याबाबत भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी संताप व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या हे अनंत करमुसे यांच्या घरी जात होते, त्यामुळे पोलिसांनी रोखल्याचा दावा राम कदम यांनी केला. अनंत करमुसे यांनीच आपल्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या हे अनंत करमुसे यांची भेट घेण्यासाठी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या घरी जाणार होते. मात्र त्यांना रोखण्यात आलं आहे.

यावर भाजप आमदार राम कदम यांनी निषेध व्यक्त केला आहे. “ठाण्यात मारहाण झालेल्या पीडित युवकाची विचारपूस करण्यासाठी निघालेले खासदार किरीट सोमय्या  यांना 15 /20 पोलिसांनी घरी जाण्यासाठी मज्जाव करणे, हाऊस अरेस्ट करणे हे कितपत योग्य आहे? ही तर मोगलाई आहे. सरकारच्या या भ्याड कारवाईचा निषेध” असं राम कदम म्हणाले.

तरुणाचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना घरात उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला आहे.

आव्हाडांनी आरोप फेटाळले

“ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि (Jitendra Awhad comment on Assaulting a Person)  माझ्या माणसांनी मारहाण केली अशी तक्रार केली आहे, त्याला मी ओळखत ही नाही,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

संबंधित बातम्या 

त्याला ओळखतही नाही, अभियंत्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फेटाळला

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.