अभिनेत्री रुही सिंहचा दारु पिऊन धिंगाणा

मुंबई: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल रुही सिंहने दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिच्यावर सांताक्रुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दारु पिऊन नशेत असतानाही तिने आजूबाजूच्या प्रवाशांना आणि पोलिसांना अरेरावी केली. प्रकरण काय? अभिनेत्री रुही सिंह रविवारी रात्री दोनच्या सुमारास एका पार्टीवरुन घरी परतत होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा मित्र राहुल …

अभिनेत्री रुही सिंहचा दारु पिऊन धिंगाणा

मुंबई: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल रुही सिंहने दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिच्यावर सांताक्रुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दारु पिऊन नशेत असतानाही तिने आजूबाजूच्या प्रवाशांना आणि पोलिसांना अरेरावी केली.

प्रकरण काय?

अभिनेत्री रुही सिंह रविवारी रात्री दोनच्या सुमारास एका पार्टीवरुन घरी परतत होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा मित्र राहुल सिंह आणि स्वप्निल सिंह गाडीत उपस्थित होते. गाडी खार लिंकिंग रोड परिसरात पोहोचली होती. दरम्यान या तिघांमधील एकाला लघुशंकेचा योग आल्याने रुहीने गाडी एका रेस्टॉरंटजवळ थांबवली. त्यानंतर ते तिघेही रेस्टॉरंटजवळ गेले असता, सुरक्षारक्षकांने रेस्टॉरंट बंद झाल्याचे सांगितले. परंतु त्याचे न ऐकता त्या तिघांनी रेस्टॉरंटचे दार जोरजोरात वाजवण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या सुरक्षारक्षकाने घाबरुन पोलिसांना याची माहिती दिली. त्या ठिकाणी पोहोचलेल्या पोलिसांनी त्या तिघांना हटकण्याचा प्रयत्न केला. परंतु दारूच्या नशेत असलेल्या या तिघांनी पोलिसांना अरेरावी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करत राहुल आणि स्वप्निल यांना अटक केली. पण त्यांनी रुहीला मात्र सोडून दिले.

दारूच्या नशेत असलेली रुही खार सांताक्रुज लिंक रोडवर गाडी चालवत होती. त्यानंतर अचानक पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांना तिने धडक दिली. सांताक्रुज पोलिसांनी याबाबत तपास केला असता, ती दारुच्या नशेत असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि रॅश ड्राइव्हिंग अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुही सिंह कोण आहे? 

रुही सिंह ही प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2011 साली मिस इंडियाचा किताब मिळवला आहे. त्यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स या सिनेमातून रुहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ती गायक आणि रॅपर म्हणूनही प्रसिद्ध आहे. रुहीने आतापर्यंत ऑपरेशन क्रोबा, स्पॉट लाईट 2 अशा दोन वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली आहे. इश्क फॉरेवर, कॅलेंडर गर्ल्स हे दोन हिंदी चित्रपट आणि बाँगू या तमिळ चित्रपटात काम केले आहे. त्याशिवाय दि वर्ल्ड बीफोर हर ही एक डॉक्युमेंटरीही तिने केली आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *