पालिकेचा दणका! खासगी रुग्णालयांनी 14 कोटी रुपये रुग्णांना दिले परत

मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या बिलांची तपासणी केली असता, 14 कोटी रुपये अधिक वसूल करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

पालिकेचा दणका! खासगी रुग्णालयांनी 14 कोटी रुपये रुग्णांना दिले परत

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयं रुग्णालयांनी फुल्ल झालेली आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये जागा नसल्यानं अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये भरती होत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णालयांनीसुद्धा रुग्णांची लूट चालवली आहे. आता मुंबई महापालिकेनं अशा खासगी रुग्णालयांना चांगलाच दणका दिला आहे. (Private hospitals paid back Rs 14 crore to patients)

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार होत असताना रुग्णांकडून अधिक बिले घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या बिलांची तपासणी केली असता, 14 कोटी रुपये अधिक वसूल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे 14 कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आल्याची मागणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार सुरू होती. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत पालिकेकडून बिलांची तपासणी करण्यासाठी 5 आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लेखा परीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली. आयएएस अधिकारी व लेखा परीक्षकांकडे 3 हजार तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 294 तक्रारी या जास्त बिलाच्या होत्या.

या बिलांची तपासणी केली असता रुग्णालयांनी 98 कोटी रुपयांच्या बिलासाठी 112 कोटी रुपये वसूल केल्याचे निदर्शनास आले. या रकमेमधील 14 कोटी रुपये अधिक वसूल केल्याचे समोर आल्याने ही रक्कम संबंधितांना परत केल्याचे काकाणी यांनी सांगितले. मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने 75 खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली होती. रुग्णालये जास्त बिले घेत असल्याचे समोर आल्याने त्यांना उपचार करण्यास बंदी घातली होती. मात्र पालिकेच्या नियमांची अंमलबजावणी केल्यावर आणि राज्य सरकारच्या नियमांचे पालन केल्यावर पुन्हा 27 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

भाटिया रुग्णालयाने 34, वोकार्ड रुग्णालयाने 38, सोमय्या रुग्णालयाने 14, कोहिनूर रुग्णालयाने 19, अपेक्स रुग्णालयाने 14 बिलांमध्ये वाढीव पैसे घेतल्याचे समोर आले आहे. तर बिलाच्या माध्यमातून अधिक पैसे वसूल करणाऱ्या दोन रुग्णालयांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती काकाणी यांनी दिली. या कारवाईमुळे इतर रुग्णालयांनी वाढीव बिले न घेता सरकारच्या नियमाप्रमाणे बिले घेण्यास सुरुवात केल्याचे काकाणी यांनी सांगितले.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेचा आरोप

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *