इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, मुंबईत PSI ला रंगेहात अटक

मुंबईतील एका छापेमारीत पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकालाच (पीएसआय) अटक केली आहे. भायखळा पोलीस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यासह दोन जणांना पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली.

इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, मुंबईत PSI ला रंगेहात अटक

मुंबई : सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय आणि पोलिसांकडून सट्टेबाजांना अटकही केली जात आहे. मुंबईतील एका छापेमारीत पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकालाच (पीएसआय) अटक केली आहे. भायखळा पोलीस स्टेशनचे पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यासह दोन जणांना पोलिसांकडून रंगेहाथ अटक करण्यात आली.

ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यावर माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिखिन शेख आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे यांना अटक करण्यात आली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यावर बेटिंग सुरु होती. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून आरोपींना रंगेहाथ पकडलं. पीएसआयला निलंबित करण्यात आलं असून माटुंगा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

मिकीन शाह नावाचा व्यक्ती ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली आणि पथकाने दादरमधील हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना दिसून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी ज्ञानेश्वर खरमाटेही तिथेच होते.

स्वतः पोलीस असलेल्या खरमाटे यांचाही सट्टेबाजांमध्ये समावेश झालाय. पोलिसांनी यानंतर तिघांना अटक केली आणि 1 लाख 93 हजार 200 रुपये रक्कम आणि सहा मोबाईल फोन ताब्यात घेतले. या सर्व आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *