राज ठाकरेंचा मुलगा अमितच्या लग्नाला राहुल गांधी येणार?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं उद्या 27 जानेवारीला लोअर परळ मधील सेंट रेगीस हॉटेलमध्ये लग्न होत आहे. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या लग्नासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी राहुल गांधींना लग्नपत्रिका पाठवली आहे. त्यामुळे या लग्नासाठी राहुल गांधी …

Headlines Today, राज ठाकरेंचा मुलगा अमितच्या लग्नाला राहुल गांधी येणार?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं उद्या 27 जानेवारीला लोअर परळ मधील सेंट रेगीस हॉटेलमध्ये लग्न होत आहे. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या लग्नासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी राहुल गांधींना लग्नपत्रिका पाठवली आहे. त्यामुळे या लग्नासाठी राहुल गांधी मुंबईत येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलेलं नाही. सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहून, राज यांनी मोदींना न बोलवता राहुल गांधींना निमंत्रण पाठवलं.

दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, शरद पवार, अजित पवार, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमीर खान, जावेद अख्तर, यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण दिलं आहे. या लग्नासाठी दुपारी 12.45 चा मुहूर्त आहे. या लग्नाला जवळपास 400 व्हीव्हीआयपी हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत. यामध्ये राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे.

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे जुने मित्र आहेत. या ओळीचं प्रेमात आणि आता विवाहबंधनात रुपांतर होणार आहे. मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. मिताली आणि राज ठाकरेंची मुलगी उर्वशी यांचीही चांगली मैत्री आहे. या दोघींनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

संबंधित बातम्या 

ऐतिहासिक! राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार, वेळ-ठिकाण ठरलं! 

भावाच्या लग्नाला जावंच लागणार, अमितच्या लग्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर    

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर   

अमितच्या लग्नपत्रिकेत 5 नावं, लग्नासाठी किती जणांना निमंत्रण?   

मोदींनी स्वत:चा खड्डा खणलाय, आधी फावडं मग कुऱ्हाड मारुन घेतील: राज ठाकरे  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *