रेल्वे, लोकलमध्ये विनामास्क प्रवास कराल तर भरावा लागेल दंड!

राज्यात अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्याही सुरु झाल्या आहेत. अशावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क प्रवास करताना कुणी आढळून आल्यास रेल्वे पोलिस त्याला दंड ठोठावणार आहेत.

रेल्वे, लोकलमध्ये विनामास्क प्रवास कराल तर भरावा लागेल दंड!

मुंबई: सरकारचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी अनलॉक दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारनं मुंबईत अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी लोकल सुरु केली आहे. त्यातबरोबर अनेक रेल्वे गाड्याही सुरु करण्यात आल्या आहेत. पण रेल्वे प्रवासादरम्यान, गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन सरकार आणि रेल्वेकडून करण्यात आलं आहे. अशा स्थितीतही काही प्रवासी नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ( Railway will fine for traveling without a mask)

रेल्वे किंवा लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क वापरला नाही तर रेल्वे पोलिसांकडून दंड आकारला जाणार आहे. सरकारनं रेल्वे पोलिसांना तसे अधिकार दिले आहेत. मुंबई महापालिकेने ठरवल्याप्रमाणे या दंडाची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळं आता रेल्वे, लोकल प्रवासादरम्यान किंवा रेल्वे स्थानकात कुणी प्रवासी विनामास्क आढळून आला तर त्याला दंड ठोठावण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा

सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे विभागाला पाठवलं होतं. रेल्वेकडून या पत्राचं उत्तर देण्यात आलं आहे. सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिवाय रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे. सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी प्रवासाची रुपरेखा ठरवावी लागणार असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य

सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल लोकल चालवण्यास सांगितले आहे. मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू आहेत. तसेच प्रत्येक लोकलमध्ये 23 टक्के जागा लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील, तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील, यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या:

लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा

दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य; रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला

Railway will charge a fine for traveling without a mask

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *