Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

शहरासह उपनगरांत सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे (Mumbai Rain). दक्षिण मुंबईसह, पूर्व आणि पश्चिम मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी (19 सप्टेंबर) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज (20 सप्टेंबर) मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस पडतो आहे.

Mumbai Rain, Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : शहरासह उपनगरांत सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे (Mumbai Rain). दक्षिण मुंबईसह, पूर्व आणि पश्चिम मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी (19 सप्टेंबर) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज (20 सप्टेंबर) मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस पडतो आहे (Mumbai Rain Update). मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. या पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेवरही पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटे उशिराने सुरु आहे (Local Railway).

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. माटुंगा, दादर, शीव, वरळी, लालबाग परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. तसेच, पश्चिम उपनगरांतही पावसाने जोर धरला आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, सांताक्रूझ या परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस आहे. तर नवी मुंबईतही पावसाच्या सरी बरसत आहेत. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबईसह उपनगरांत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. तर मुंबईकरांना काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

LIVE UPDATE

Mumbai Rain, Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईतील हिंदमाता परिसरात सकाळी मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं, मात्र आता पाऊस थांबला आहे, तसेच रस्त्यावरील पाण्याचाही निचरा झाला आहे, परिसरातील वाहतूक पुर्वपदावर

20/09/2019,11:43AM
Mumbai Rain, Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

पावसाचा जोर मंदावतो आहे, हळूहळू सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात

20/09/2019,11:42AM
Mumbai Rain, Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मालाड सबवेमध्ये हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता

20/09/2019,9:41AM
Mumbai Rain, Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

बोरीवली, कांदीवली आणि मालाडमध्येही जोरदार पाऊस, पावसामुळे लिंक रोडवर वाहतूक कोंडी

20/09/2019,9:37AM
Mumbai Rain, Rain Live Update : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

सकाळपासून अंधेरी, सांताक्रूझ परिसरात जोरदार पाउस, परिसरात पावसाचा जोर वाढला, रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात

20/09/2019,9:36AM

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *