प्रश्नही माझे, उत्तरंही माझीच, राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फटकाऱ्यातून काही सुटताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या कुंचल्यातून निशाणा साधला आहे. यावेळी, मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचं निमित्त ठरलं. काय आहे व्यंगचित्रात? ‘एक मनमोकळी मुलाखत!’ असा मथळा या व्यंगचित्राला दिला आहे. मुलाखत घेणाऱ्या आणि मुलाखत देणाऱ्याच्या अशा …

प्रश्नही माझे, उत्तरंही माझीच, राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फटकाऱ्यातून काही सुटताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या कुंचल्यातून निशाणा साधला आहे. यावेळी, मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचं निमित्त ठरलं.

काय आहे व्यंगचित्रात?

‘एक मनमोकळी मुलाखत!’ असा मथळा या व्यंगचित्राला दिला आहे. मुलाखत घेणाऱ्या आणि मुलाखत देणाऱ्याच्या अशा दोन्ही खुर्चीत नरेंद्र मोदी यांचे चित्र दाखवण्यात आले असून, त्यांच्या मागे असणाऱ्या पोस्टर्सवरही मोदींचे वेगवेगळे फोटो दाखवलं आहे.

नव्या वर्षानिमित्त एएनआय वृत्तसंस्थेने नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवरुन देशभारत प्रचंड चर्चा सुरु आहे. काल लोकसभेतही या मुलाखतीचा दाखल देत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती.

अखेर आज राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून मोदींवर निशाणा साधला आहे. या आधीही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर अनेकदा व्यंगचित्रातून वार केले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *