Raj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह अनेक जण ताब्यात

मनसे नेते संदीप देशपांडेसह इतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अनेकांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

Raj Thackeray | मनसैनिकांच्या टी शर्टवर EDiot Hitler, संदीप देशपांडेंसह अनेक जण ताब्यात

मुंबई : कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज ठाकरे  चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडेसह इतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह अनेकांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडे यांना दादरमधील शिवसेना भवनाच्या समोरच्या बीट चौकीमध्ये ठेवण्यात आलं होतं.

संदीप देशपांडे यांनी EDiots Hitler असे लिहीलेले काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. त्यानंतर पोलिसांनी देशपांडे यांना हे टीशर्ट काढण्यास सांगितले असता, त्यांनी याला नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेत बीट चौकीमध्ये ठेवले होते.

संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी टीव्ही 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असे देशपांडे यांना विचारले असता, त्यांनी हो निश्चित असे सांगितले. तसेच मी काहीही गैर केलेले नसतान मला जबरदस्ती येथे आणलं आहे असेही प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

संदीप देशपांडेसह इतर मनसे कार्यकर्त्यांनीही EDiots Hitler असे काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले आहे. राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरुन कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष डोके यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभाग अध्यक्ष विनायक रणपिसेही ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही  EDiots Hitler चा  टी शर्ट घालून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

संदीप देशपांडे यांच्यानंतर मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. ठाण्यातील कोपरी पोलिसांनी रवी मोरे यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना नोटिसा बजवण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यातील मनसे कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे , दादर पोलीस ठाणे आणि मरिन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 ( जमावबंदी) लागू करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *