राज ठाकरेंची विधानसभेची तयारी सुरु, मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावलं!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही, राज्यभरात ‘मोदी शाह मुक्त भारत’चा नारा देत राजकीय रणांगण दणाणून सोडणाऱ्या राज ठाकरेंनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावलं आहे. येत्या 13 मे रोजी ठाण्यात मनसेचा पदाधिकारी कार्यशाळा होईल. यात स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना …

राज ठाकरेंची विधानसभेची तयारी सुरु, मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावलं!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही, राज्यभरात ‘मोदी शाह मुक्त भारत’चा नारा देत राजकीय रणांगण दणाणून सोडणाऱ्या राज ठाकरेंनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावलं आहे. येत्या 13 मे रोजी ठाण्यात मनसेचा पदाधिकारी कार्यशाळा होईल. यात स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय, राज ठाकरे पक्षाची नव्याने बांधणी करुन, राज्यभरात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र, ‘मोदी शाह मुक्त भारत’ असे म्हणत राज  ठाकरेंनी राज्यभरात दहा सभा घेतल्या. या दहा सभांनी लोकसभेचं वातावरण तापलंच, मात्र सोबत मनसेच्या कार्यकर्त्यांनाही नवी ऊर्जा मिळाली. त्यामुळे या उर्जेचा फायदा राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने राज ठाकरेंनी काम करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून राज ठाकरेंनी येत्या 13 जानेवारी रोजी ठाण्यात राज्यातील सर्व पदाधिकऱ्यांना बोलावलं आहे.

मनसेचे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्या ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे 13 मे रोजी जमणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या कार्यशाळेत थेट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. मनसेचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, नगरपालिका-महानगरपालिका क्षेत्रातील शहाराध्यक्ष, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक शहरातील विभाग अध्यक्ष, संघटनांचे अध्यक्ष, सरचिटणीस, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना राज ठाकरेंनी ठाण्यातील कार्यशाळेत बोलावलं आहे.

विशेष म्हणजे, विधानसभेच्या दृष्टीने तयारी करण्यासोबतच, राज ठाकरेंनी ग्रामीण भागातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती काय, याचीही माहिती देण्यास सांगितली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे पक्षबांधणीसोबतच राज्यातील मुद्द्यांवरही गांभिर्याने पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, मनसेची ठाण्यातील कार्यशाळा 13 मे रोजी आहे. या कार्यशाळेत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून काय बोलतात आणि त्यात आपली आगामी भूमिका काय जाहीर करतात, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *