राज ठाकरे पुणे, कोल्हापूर दौऱ्यावर, पुढील आठवड्यात आघाडीचा संभ्रम दूर करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीबाबत मनसेकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र अजून कोणताही निर्णय झाला नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. आघाडीत जायचं की नाही हा निर्णय आता मनसे पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण राज …

राज ठाकरे पुणे, कोल्हापूर दौऱ्यावर, पुढील आठवड्यात आघाडीचा संभ्रम दूर करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीबाबत मनसेकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र अजून कोणताही निर्णय झाला नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. आघाडीत जायचं की नाही हा निर्णय आता मनसे पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण राज ठाकरे उद्यापासून पुणे,कोल्हापूर, कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.  या दौऱ्यावरुन परतल्यानंतर मनसेचा आघाडीबाबतचा निर्णय होऊ शकतो.

अजित पवार – राज ठाकरेंची भेट

“मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेने गेल्यावेळी एक लाख मतं घेतली होती. माझं वैयक्तिक मत आहे की एकत्र आले पाहिजे” असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी 13 फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला आघाडीत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून येते आहे. त्यातच अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तर या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे.

अजित पवारांच्या ‘राज’भेटीनंतर ‘कृष्णकुंज’वरील हालचाली वाढल्या!

“होय, मी राज ठाकरे यांना भेटलो. मोदीविरोधी सर्व पक्ष, नेते एकत्र यावेत, हे माझे मत आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे.”, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासंदर्भात सहमती दर्शवली.

शरद पवार-राज जवळीक, मनसेसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या कोट्यातून मनसेला देण्याबाबत चर्चाही सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसेला आघाडीच्या कोट्यातून मुंबईत लोकसभेसाठी एक जागा देण्याची चर्चा आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला द्यावी आणि इतर ठिकाणी त्यांची मदत घ्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला होता.

संबंधित बातम्या

राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक 

महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?  

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न 

ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान  

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…  

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न 

 राज ठाकरेंकडे हजारो मतं, फायदाच होईल: छगन भुजबळ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *