मनसेच्या नव्या दिशेची पहिली झलक, मंचावर थेट सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन!

राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होत आहे. याची जय्यत तयारी मनसेने (Savarkar Photo in MNS Adhiveshan) केली आहे. गोरेगावातील नेस्को मैदानावर हे अधिवेशन होत आहे.

Savarkar Photo in MNS Adhiveshan, मनसेच्या नव्या दिशेची पहिली झलक, मंचावर थेट सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन!

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होत आहे. याची जय्यत तयारी मनसेने (Savarkar Photo in MNS Adhiveshan) केली आहे. गोरेगावातील नेस्को मैदानावर हे अधिवेशन होत आहे. राज्यभरातील हजारो मनसैनिक या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राज ठाकरे ज्या व्यासपीठावरुन भाषण करणार आहेत, ते व्यासपीठही सज्ज करण्यात आलं आहे. संध्याकाळी 6.30 वाजता राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Savarkar Photo in MNS Adhiveshan)

मनसे महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकार यांचा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो असायचे. आता त्यांच्यासोबत सावरकार यांच्या फोटोलाही स्थान देण्यात आलं आहे. मनसे झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असताना पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर झालेला हा बदलही चर्चेचा विषय आहे.

गेल्या काही दिवसापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन देशासह राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांवरुन भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ठाकरे सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात भाजपने याच मुद्द्यावरुन पहिल्या दिवसाचं कामकाज बंद पाडलं होतं. तसंच सावरकरांच्या भारतरत्नसाठी आग्रही असलेली शिवसेना आता गप्पा का असा सवाल भाजपने शिवसेनेला विचारला होता.

या वादानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकरांबाबत सेनेची भूमिका कायम असल्याचं म्हणत, त्यांना भारतरत्न मिळायलाच हवा असं म्हटलं होतं.

एकीकडे सावरकर वादावरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं असताना, मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा बरंच काही सांगून जाते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *