राज ठाकरे आमचे स्टार प्रचारक : सचिन अहिर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत भाजपविरोधात सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्वागत केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केवळ राष्ट्रवादीचे नेतेच नाही, तर देश पातळीवरचे अनेक नेते करतात. आजचं जे वातावरण आहे ते पाहता मोदी विरोधात […]

राज ठाकरे आमचे स्टार प्रचारक : सचिन अहिर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत भाजपविरोधात सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. राज ठाकरे यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्वागत केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती केवळ राष्ट्रवादीचे नेतेच नाही, तर देश पातळीवरचे अनेक नेते करतात. आजचं जे वातावरण आहे ते पाहता मोदी विरोधात एकत्र यायला हवं. विरोधी पक्षातील सर्व नेते, मग राज ठाकरे असो आमचे ते स्टार प्रचारक आहेत, असं अहिर म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली आहे. युती किंवा आघाडी यामध्ये आपल्याला रस नसून फक्त मोदीमुक्त भारत हे ध्येय असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यापुढच्या माझ्या सर्व सभा या मोदी-शाह यांच्याविरुद्ध असतील. येणारी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध संपूर्ण देश अशी असेल, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी आघाडीत यावं, असं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांना भेटण्यासाठी बोलावलं. या भेटीमध्ये आपण कोणतीही अशी मागणी केली नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही हेच सांगितलं, असं राज ठाकरे म्हणाले.

विनोद तावडेंचं राज ठाकरेंना उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. राज ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे केवळ नाटक होतं, इतकंच नाही तर तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन त्यांनी कुठेतरी एक जागा लढावी आणि आपलं डिपॉझिट वाचवून दाखवावं, असं आव्हान विनोद तावडेंनी दिलं.

पाहा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.