...म्हणून माझी आणि पवारांची ईडी चौकशी, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट!

राज ठाकरे (Raj Thackeray ED) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका (MNS Vidhansabha election) लढवणार आहेत.

...म्हणून माझी आणि पवारांची ईडी चौकशी, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट!

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray ED) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका (MNS Vidhansabha election) लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरेंच्या (Raj Thackeray ED) उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी आपली ईडी चौकशी का झाली, त्यामगचं कारणही सांगितलं.

ईडी चौकशी

“माझी आणि पवार कटुंबियांमागे ED चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे. ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची कोहिनूर मिल खरेदीप्रकरणात ईडी चौकशी झाली. तर शरद पवार यांचं नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्यात आलं.

आतला आवाज सांगतोय, यावेळी यश नक्की

दरम्यान, या मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. माझा आतला आवाज सांगतोय, यावेळी यश नक्की मिळेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

2 दिवसात उमेदवार यादी

येत्या दोन दिवसात मनसेची उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसंच 5 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल.

एकट्याने बहिष्कार टाकण्यापेक्षा लढलेलं बरं

EVM विरोधाची भूमिका मी घेतली होती. निवडणूक लढवावी की नाही या विचारात मी होतो. EVM विरोधाबाबत मी अनेक नेत्यांना भेटलो. सोनिया गांधी, ममता बनर्जी यांची भेट घेतली. पण कालांतराने कुणीही ठोसपणे पुढे आले नाही. मी अनेकांशी या विषयावर बोललो, त्यानंतर आपण एकट्यानेच निवडणुकीवर बहिष्कार का टाकावा ? असा विचार केला. पक्षात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत. भाजपकडून कुठली ना कुठली चूक होईलच आणि त्यात आपल्याला यश मिळेल, असं राज ठाकरे म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *