राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला अजूनही परवानगी नाही

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये 24 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मनसेच्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 18 एप्रिल रोजी मनसेतर्फे पत्र देऊन 24 एप्रिल रोजी शिवडी विधानसभेत असलेले मैदान सभेसाठी मागितलं. मात्र त्यासाठी अजूनही वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप मनसेकडून केला जातोय. काळाचौकी अभ्युदय नगरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंची सभा घेण्याची मनसेची योजना आहे. …

राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला अजूनही परवानगी नाही

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये 24 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मनसेच्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. 18 एप्रिल रोजी मनसेतर्फे पत्र देऊन 24 एप्रिल रोजी शिवडी विधानसभेत असलेले मैदान सभेसाठी मागितलं. मात्र त्यासाठी अजूनही वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप मनसेकडून केला जातोय.

काळाचौकी अभ्युदय नगरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंची सभा घेण्याची मनसेची योजना आहे. मात्र निवडणूक विभागाच्या एक खिडकी योजनेकडून मनसेने  परवानगी घ्यावी, असं स्थानिक मनपा अधिकारी म्हणत आहेत. तर एक खिडकी योजनेचे अधिकारी म्हणतात, की मनसे लोकसभा निवडणूक रिंगणात नाही म्हणून आमची परवानगीची गरज नाही. मात्र मनपा एफ साऊथ विभागाकडून अजूनही मनसेला परवानगी देण्यात आली नाही.

परवानगी देण्यास महापालिका अधिकारी जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेतर्फे केला करण्यात आलाय. राज ठाकरेंच्या सभांमुळे शिवसेना आणि भाजपला धडकी भरल्याचं मनसेने म्हटलंय. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची सभा महत्त्वाची आहे. कारण, मुंबईतील सर्व जागांसाठी 29 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे.

चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघांसाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *