रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश, गरवारे क्लबमध्ये स्वागतोत्सुक शरद पवार!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे सभागृहात झाला. मात्र या सभागृहाच्या निमित्ताने एक अनोखा योगायोग समोर आला. या सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचा फलक आहे. राष्ट्रवादीतून […]

रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश, गरवारे क्लबमध्ये स्वागतोत्सुक शरद पवार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गरवारे सभागृहात झाला. मात्र या सभागृहाच्या निमित्ताने एक अनोखा योगायोग समोर आला.

या सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचा फलक आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराचं स्वागत थेट शरद पवारच करत असल्याचा विरोधाभास या फलकाच्या निमित्ताने दिसून आला. ज्या फलकावर स्वागतोत्सुक म्हणून शरद पवारांचं नाव आहे, त्याच ठिकाणी मोहिते पाटील समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत आहेत.

शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. गरवारे क्लब हा एमसीएचाच भाग आहे. गरवारे क्लबचं अध्यक्षपद पवारांकडे आहे. त्यामुळेच स्वागतोस्तुक म्हणून अध्यक्षांचं नाव बोर्डवर लिहिलेलं आहे. मात्र ज्या सभागृहात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या कार्यकर्त्याचा प्रवेश भाजपमध्ये होत आहे, त्याच सभागृहात हा विरोधाभास दिसून येत आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीकडून माढ्याची उमेदवारी मिळणं अशक्य असल्याने, रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.