वसईत 31 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी

31 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायत या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:02 PM, 27 Nov 2020

वसई : वसई ताल्युक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहेत. 31 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायत या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यापैकी 9 ग्रामपंचायत या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी तर 10 ग्रामपंचायत या अनुसूचित जमातीच्या पुरुष प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या आहेत. (Reservation of 31 Gram Panchayat Sarpanch posts announced in Vasai here is full list)

मिळालेल्या माहितीनुसार, 12 ग्रामपंचायत या बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी राखीव आहेत. यातील अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 तर नागरिकांचा प्रवर्गमधील महिलांसाठी 3 ग्रामपंचायत राखीव करण्यात आल्या आहेत. इतर 8 ग्रामपंचायत सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असून यामध्ये 4 ग्रामपंचायत महिलांसाठी तर 4 पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती
01. अनुसूचित जमाती महिला सरपंच

– मेढे, माजीवली-देपिवली, शिवनसई, आडने-भिणार, पारोळ,उसगाव, करझोन, नागले, सायवन या 9 ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला सरपंचसाठी राखीव

02. सर्वसाधारण अनुसूचित जमाती पुरुष सरपंच

– सकवार, टीवरी, चंद्रापाडा, टोकरे, मालजीपाडा, भाताने, तिल्हेर, शिरवली, पोमन, खाणीवडे या अनुसूचित जमाती पुरुष सरपंचसाठी राखीव

03. नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदासाठी महिला राखीव ग्रामपंचायत

– वासलई, खोचिवडे, पाली

04. सत्पाला, (अनुसूचित जमाती महिला सरपंच राखीव )

05. सर्वसाधारण महिला सरपंच ग्रामपंचायत राखीव

– कळंब, तरखड, अर्नाळा किल्ला, पणाजु (Reservation of 31 Gram Panchayat Sarpanch posts announced in Vasai here is full list)

06.सर्वसाधारण पुरुष सरपंच ग्रामपंचायत राखीव

– अर्नाळा, खार्डी-डोलीव, टेंभी, राणगाव

इतर बातम्या – 

Mumbai | मराठा आरक्षणासाठी चेंबूर पंजरापोल सर्कल येथे मराठा समाजाचं आंदोलन

उद्धव ठाकरे मराठाद्वेषी; ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही: नितेश राणे

(Reservation of 31 Gram Panchayat Sarpanch posts announced in Vasai here is full list)