‘मातोश्री’ परिसरातून अट्टल दरोडेखोराला अटक, 1 पिस्तूल, 7 राऊंड जप्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका अट्टल दरोडेखोराला अटक करण्यात आलं आहे.

'मातोश्री' परिसरातून अट्टल दरोडेखोराला अटक, 1 पिस्तूल, 7 राऊंड जप्त
Follow us
| Updated on: Mar 02, 2020 | 1:01 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात एका अट्टल दरोडेखोराला अटक करण्यात आलं आहे (Robber arrested from Matoshree area). इर्शाद खान असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून काही शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. यात एक पिस्तुल आणि 7 राऊंडचा समावेश आहे. गुन्हे शाखेचं युनिट 9 ने ही कारवाई केली.

मातोश्रीजवळील हायवेवर खेरवाडी जंक्शन परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मातोश्रीपासूनच काही अंतरावर त्याला अटक झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांना खबऱ्याकडून संबंधित आरोपी शस्त्रविक्रीसाठी या परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यात आरोपीकडे एक गावठी बनावटीचा पिस्तूल आणि 7 जिवंत काडतूस मिळाली.

आरोपी इर्शाद खानवर मुंबईसह गुजरातमध्ये खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो राज्यातही अनेक दरोड्यांच्या प्रकरणांमध्ये सक्रीय होता. मुंबईत त्याच्याविरोधात 6 ते 7 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. दरोडा करताना तो धाक दाखवण्यासाठी शस्त्रांचा वापर करतो. आजपर्यंतच्या तपासात इर्शाद खान मोठा दरोडेखोर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विशेष म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातच दरोडेखोराला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. मातोश्री परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही आरोपी याच परिसरात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेच्या युनिट 9 चं या कामाबद्दल कौतुक केलं आहे. गुन्हा होण्याच्या आधीच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.

Robber arrested from Matoshree area Mumbai

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....