हेअर ट्रान्सप्लांटनंतर दोन दिवसांनी व्यावसायिकाचा मृत्यू  

मुंबई : साकिनाका येथील व्यावसायिकाचा केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लांट) केल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. श्रवण कुमार चौधरी (43) यांचा शनिवारी हेअर ट्रान्सप्लांटच्या 50 तासांनंतर मृत्यू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते अॅलर्जीने श्रवण यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हेअर ट्रान्सप्लांट करताना किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही ट्रीटमेंट करताना खरंच हवी ती काळजी घेतली जाते का […]

हेअर ट्रान्सप्लांटनंतर दोन दिवसांनी व्यावसायिकाचा मृत्यू   
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : साकिनाका येथील व्यावसायिकाचा केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लांट) केल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. श्रवण कुमार चौधरी (43) यांचा शनिवारी हेअर ट्रान्सप्लांटच्या 50 तासांनंतर मृत्यू झाला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते अॅलर्जीने श्रवण यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हेअर ट्रान्सप्लांट करताना किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही ट्रीटमेंट करताना खरंच हवी ती काळजी घेतली जाते का हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

श्रवण कुमार चौधरी हे शुक्रवारी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात पोहोचले. तेव्हा त्यांना श्वास घेण्यात अडथळा येत होता. तसेच, त्यांच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर सुज होती. त्यांना ऍनाफिलेक्सिस (anaphylaxis) या जीवघेण्या अॅलर्जीने ग्रासल्याचं हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं. अॅलर्जीनेच श्रवण यांचा जीव घेतला. शनिवारी सकाळी 6.45 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ही अॅलर्जी हेअर ट्रान्सप्लांटनंतर झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण यांनी 50 तासाआधी ही हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट केली होती. यामध्ये जवळपास 9,500 हेअर ग्राफ्ट्स इंम्प्लांट करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी एकूण 15 तास लागले होते.

आज हेअर ट्रान्सप्लांट, प्लास्टिक सर्जरी असे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जातात. या ट्रीटमेंटमुळे शरीरात हवे तसे बदल घडवून आणले जातात. त्यातच आता हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटही लोक मोठ्याप्रमाणात करत आहेत. मात्र, हवी ती काळजी घेतली नाही तर या ट्रीटमेंट तुमच्यासाठी जीवघेण्याही ठरु शकतात.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.