फडणवीसांच्या ‘या’ चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांच्या 'या' चुका 80 तासात भाजपला घेऊन बुडाल्या : संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 01, 2019 | 8:28 PM

मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis). राऊत यांनी फडणवीसांच्या चुकांवर बोट ठेवत या चुकांमुळेच भाजप महाराष्ट्रात बुडाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सामनातील त्यांचे सदर ‘रोखठोक’मध्ये यावर सविस्तर भाष्य केलं आहे (Sanjay Raut explain mistakes of Devendra Fadnavis).

फडणवीसांची सत्ता मिळवण्याची घाई आणि बालिश विधानं यांच्यामुळे भाजप बुडाल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष असेल, शरद पवार यांचे पर्व संपले, अशी बालिश विधाने करणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आहेत. मी पुन्हा येईन असं ते सांगत होते. मात्र, पुन्हा येण्याची अति घाई त्यांना नडली आणि केवळ 80 तासात त्यांचे सरकार भाजपला घेऊन बुडाले. दिल्लीच्या भरवशावर आणि फाजिल आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले.”

महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या झुंडशाहीसमोर झुकलेला नाही. महाराष्ट्राचे पाणी वेगळेच आहे. हे मागील महिनाभरातील घडामोडींवरुन स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिवसाढवळ्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ देशाचे राजकारण बदलून टाकेल, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

“मोदी शाहांचं बलाढ्य राज्य उलथवून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री”

संजय राऊत यांनी पवारांचं कौतुक करतानाच मोदी आणि शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या नाट्यमय घडामोडी कधीच घडल्या नाहीत. शरद पवार यांनी मनात आणलं तर ते कोणतीही उलथापालथ घडवू शकतात यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागला. त्याचवेळी पवारांबाबतच्या एका दंतकथेचाही शेवट झाला. शरद पवार यांचे राजकारण विश्वसनीय नाही. पवारांचे राजकारण फसवाफसवीचे आहे या दंतकथेवर आता पडदा पडला. आज महाराष्ट्रात मोदी शाह यांचे बलाढ्य राज्य उलथवून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे.”

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.