पाकिस्तानी-बांग्लादेशी भारतात येऊ शकतात, मग मी बेळगावात जाऊ शकत नाही का? संजय राऊत बेळगावला रवाना!

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे (Sanjay Raut to visit belgaum).

Sanjay Raut going to belgaum after police, पाकिस्तानी-बांग्लादेशी भारतात येऊ शकतात, मग मी बेळगावात जाऊ शकत नाही का? संजय राऊत बेळगावला रवाना!

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे (Sanjay Raut to visit belgaum). बेळगावमध्ये संजय राऊत बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन करतील. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी बेळगावमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे (Sanjay Raut to visit belgaum).

संजय राऊत म्हणाले, “भारतात कुणालाही कोठेही जाण्याची बंदी घातली जाऊ शकत नाही. आपल्या देशात पाकिस्तानी घुसू शकतात, बांग्लादेशी घुसू शकतात, रोहिंग्या घुसू शकतात, मात्र महाराष्ट्रातून कुणी बेळगावला जाऊ शकत नाही हे चुकीचं आहे. बेळगावबाबत वाद आहे, मात्र हा वाद इतकाही नाही की एकमेकांवर बेळगावमध्ये जाण्यास बंदी घालावी. आपण एका देशाचे नागरिक आहोत. मी बेळगावला जाणार आहे आणि लोकांशी बोलणार आहे. तेथील लोकांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत. त्यामुळे मी जरुर जाईल. बंदी लावायची असेल तर लावू द्या. मात्र, मला विश्वास आहे तेथील सरकार देखील समजूतदारपणे काम करेल.”

विशेष म्हणजे सुरुवातीला बेळगाव पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तसेच संजय राऊत बेळगावमध्ये आल्यास करवाईचाही इशारा दिला होता. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्रात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. आयोजक आणि संजय राऊतही कार्यक्रम घेण्यावर ठाम राहिले. यानंतर बेळगाव पोलिसांनी अखेर परवानगी दिली. संजय राऊत आज (18 जानेवारी) सायंकाळी 4 वाजता बेळगावात पोहचतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे.

यड्रावकर यांच्यावर कर्नाटक पोलिसांची कारवाई

दरम्यान, शुक्रवारी (17 जानेवारी) सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. बेळगावात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम दरवर्षी 17 जानेवारीला आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावला पोहोचले. मात्र, हुतात्मा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यड्रावकर यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले.

यावेळी यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला. यड्रावकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेळगाव पोलिसांनी कुणाचंही ऐकून घेतलं नाही आणि थेट यड्रावकर यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे बराच तणाव निर्माण झाला होता.

यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच संजय राऊत यांनी स्वत: बेळगावला जाण्याची घोषणा केली. संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले होते, “महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांची धक्काबुक्की. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखले. महाराष्ट्र भाजप या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? मी उद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय. जय महाराष्ट्र”.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राचा मंत्री कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊतांनी बाह्या सरसावल्या, उद्याच बेळगावला जाणार!

बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *