सीवूड्समध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे 7 जवान जखमी

सीवूड्स सेक्टर 44 मधील सी-होम्स इमारतीला भीषण आग लागली होती. या घटनेत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी ऐरोली बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

SeaWoods Fire, सीवूड्समध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे 7 जवान जखमी

नवी मुंबई : सीवूड्स सेक्टर 44 मधील सी-होम्स इमारतीला भीषण आग लागली होती. या घटनेत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी ऐरोली बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे (SeaWoods Fire). ही आग आटोक्यात आणण्यासाठी ऐरोली, बेलापूर, वाशी, नेरुळ येथून अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ब्रिनटोच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तब्बल पाच तासांनंतरही या आगीवर नियंत्रण मिळालेलं नाही (SeaWoods Fire).

सीवूड्सच्या सेक्टर 44 मधील सी होम्स या इमारतीच्या 20 आणि 21 व्या मजल्यावर सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, ही आग भीषण असल्याने ती आटोक्यात आणणे कठीण झाले होते. यामध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले सात जवान जखमी झाले.

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या फायर सिस्टम काम करत नव्हत्या. फायर फायटिंग सिस्टम काम न केल्याने ही आग अधिक पसरली.

टॉवरच्या 20 आणि 21 व्या मजल्यावर ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाना सुरक्षित खाली उतरवण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने आग अधिक पसरणार नाही याची काळजी घेतली. अन्यथा मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली असती. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *