मुंबईच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवली!

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात व्हायला आता केवळ एक दिवस उरला आहे. उद्या थर्टी फर्स्ट आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री नवीन वार्षाचं स्वागत करण्यासाठी मोठया प्रमाणात लोक ‘गेटवे ऑफ इंडिया’वर जमणार आहेत. त्यामुळे या उत्साहात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुबंई पोलिसांनी गेटवेवर कडक बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी गेटवे वर येणाऱ्यांसाठी दोन ग्राउंड तयार केले …

मुंबईच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढवली!

मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात व्हायला आता केवळ एक दिवस उरला आहे. उद्या थर्टी फर्स्ट आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री नवीन वार्षाचं स्वागत करण्यासाठी मोठया प्रमाणात लोक ‘गेटवे ऑफ इंडिया’वर जमणार आहेत. त्यामुळे या उत्साहात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुबंई पोलिसांनी गेटवेवर कडक बंदोबस्त लावला आहे.

पोलिसांनी गेटवे वर येणाऱ्यांसाठी दोन ग्राउंड तयार केले आहेत. एकीकडे फक्त पुरुष मंडळी असणार जे बॅचलर आहेत, त्यामध्ये एक पडदा असेल आणि दुसऱ्या बाजूला कुटूंबासोबत येणारी लोकं असतील.

गेटवेवर पाहणीकरिता पोलिसांनी 16 अतिरिक्त सीसीटीव्ही बसवायची तयारी केली आहे. 11 कैमरे पूर्वीपासूनच गेटवेवर आहेत. तर जवळपास 60 पोलीस कर्मचारी गेटवेवर बंदोबस्तावर राहणार आहेत.गेटवेवर पोलिसांनी 4 ते 5 मोठे मंच तयार केले आहेत, ज्यावरुन ते सर्वांवर नजर ठेवणार.

गेटवेमध्ये प्रवेश करताना सर्वांना अंगझडती द्यावी लागणार आहे. महिलांशी कोणी छेडछाड करू नये, यासाठी  गर्दीमध्ये काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सिव्हिल ड्रेसमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

गेटवे वर डीजेची परवानगी नसणार आहे. मात्र थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी सकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *