राजेंचं मनोमिलन, उदयनराजे म्हणतात, शिवेंद्रराजे बैठकीत हसत होते!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. शरद पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. एकदा दिलजमाई करुनही दोन्ही राजांमध्ये कुरबुर सुरुच होती. मात्र आज दोघांना एकत्र घेऊन शरद …

राजेंचं मनोमिलन, उदयनराजे म्हणतात, शिवेंद्रराजे बैठकीत हसत होते!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये पुन्हा एकदा दिलजमाई केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. शरद पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. एकदा दिलजमाई करुनही दोन्ही राजांमध्ये कुरबुर सुरुच होती. मात्र आज दोघांना एकत्र घेऊन शरद पवारांनी वाद मिटवला, असा दावा दोन्ही राजांनी केला.

राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयंत पाटील उपस्थित होते.

साताऱ्यात उदयनराजेंच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच कलह आहे. येत्या निवडणुकीत पक्षातील वाद डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय स्वत: पवार लढत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात  सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा येतात. या सर्व परिस्थितीचा आढावा आज पवारांनी घेतला.

शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?

शरद पवार यांच्या पुढे आम्ही कोणीही नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांना समजवावं लागेल. माझ्या निवडणुकीला (विधानसभेला) वेळ आहे. एकत्र काम करायचं असं ठरलेलं आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर दिली.

उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या बैठकीनंतर उदयनराजे म्हणाले, आमच्यात फार वाद नव्हता. थोडा फार वाद राहणारच. शरद पवार यांना शिवेंद्रराजे भेटले नव्हते तर कार्यकर्ते भेटले होते. त्याला शिवेंद्रराजे किंवा मी जबाबदार नाही. शिवेंद्रराजे आतमध्ये हसत होते. मतभेद काही प्रमाणात होते, मतभेद कुणात नसतात. पक्षाच्या आदेशानं स्थानिक पातळीवर काम करणार”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *