गेल्यावेळी चुकलो, 'मातोश्री'चा शब्द मानला, आता लिहून दिल्याशिवाय हटणार नाही : शशांक राव

मुंबई : गेल्यावेळी चुकलो, ‘मातोश्री’चा शब्द मानला, मात्र यावेळी लिहून दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असे म्हणत कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ठेवण्याची घोषणा केली. आज संध्याकाळी शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गंभीर आरोपही केले. उद्धव ठाकरेंवर टीका आणि गंभीर आरोप …

गेल्यावेळी चुकलो, 'मातोश्री'चा शब्द मानला, आता लिहून दिल्याशिवाय हटणार नाही : शशांक राव

मुंबई : गेल्यावेळी चुकलो, ‘मातोश्री’चा शब्द मानला, मात्र यावेळी लिहून दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असे म्हणत कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ठेवण्याची घोषणा केली. आज संध्याकाळी शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गंभीर आरोपही केले.

उद्धव ठाकरेंवर टीका आणि गंभीर आरोप

“गेल्यावेळी चूक केली, मातोश्रीचा शब्द मानला. आता लिखित दिल्याशिवाय मागे हटणार नाही.”, असे म्हणत शशांक राव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोही केला. राव म्हणाले, “सगळ्यांना प्रश्न असेल, मुख्यमंत्री यात हस्तक्षेप का करत नाही? पण मला कळलंय की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की, बेस्ट कर्मचाऱ्यांना काहीही द्यायचं नाहीय.” असे आरोप करत असताना, शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून काही प्रश्नही विचारले, ते म्हणाले, “जो कामगार रात्रं-दिवस काम करतो, त्याला तुम्ही असे वागवणार आहात? मराठी-मराठी बोलता, त्याला हे देणार आहात?”

शशांक राव आणखी काय म्हणाले?

बेस्ट कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली, त्यांना सलाम, असे म्हणत शशांक राव यांनी बेस्ट कर्माचऱ्यांना सलाम ठोकला. तसेच, “मी कधीच कुणावर टीका करत नाही, कुठल्या संघटनेवर टीका करत नाही. पण शिवसेना किती खालच्या पातळीवर जाणार आहे? आज त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते, त्यांना सांगितलं गेलं की, उद्या कामावर चला, कोर्ट यात मध्यस्थी करतंय. मला कळकळीची विनंती, ही ऑर्डर घ्या. झेंडा-बावटे नंतर पकडा. पण आधी कुटुंब टिकवायचं असेल, तर या लढ्यात सामील व्हा. अन्यथा कुटुंब टिकणार नाही. कारण घरी चूल पेटली नाही, तर आपण कुणाचे झेंडे पकडणार आहोत? आणि सातत्याने सांगतायत, मिल कामगार होईल, मिल कामगार होईल. लोक सांगतात, मुंबईकर जनतेला वेठीस धरतोय. आम्ही मुंबईकर नाहीत का, आम्ही मुंबईला सेवा देत नाही का?”, असे शशांक राव म्हणाले.

“आपण लढा सुरु केला आहे आणि हा लढा पुढे घेऊन जाऊ. उद्या कोर्टात सुनावणी आहे. आतापर्यंत कोर्टाने सहानुभूती दाखवली आहे. कोर्टाला विनंती आहे, पुन्हा सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा.”, असेही शशांक राव म्हणाले.

संपाचा आठवा दिवस

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. संपाच्या आठव्या दिवशीही तोडगा निघालेला नाही. आज हायकोर्टात संपाबाबत सुनावणी झाली. हायकोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना झापलं. जर कामगार संघटना उद्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास, राज्य सरकार त्यांना जे काही कायदेशीर करणं शक्य आहे ते करू शकतात, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी दिले. इतकंच नाही तर बेस्ट कामगार संघटनांनी आपली भूमिका कोर्टाला कळवावी, असा आदेशही हायकोर्टाने दिला.

संबंधित बातम्या

बेस्टच्या संपाचा सातवा दिवस, अद्याप कोणताही तोडगा नाही   

BEST STRIKE: संप चालू ठेवून तोडगा कसा काढणार? हायकोर्टाने झापलं 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *