स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेची 53 वर्षे, सेनेला मुख्यमंत्रिपद कसं मिळणार?

विधानसभा निवडणुका साडे तीन महिन्यांवर आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचं अजून निश्चित नाही. पण भाजप-शिवसेनेची युती ठरली आहे. मात्र शिवसेनेची नजर मुख्यमंत्रीपदावर आहे.

स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेची 53 वर्षे, सेनेला मुख्यमंत्रिपद कसं मिळणार?
Follow us
| Updated on: Jun 19, 2019 | 5:15 PM

मुंबई : विधानसभा निवडणुका साडे तीन महिन्यांवर आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचं अजून निश्चित नाही. पण भाजप-शिवसेनेची युती ठरली आहे. मात्र शिवसेनेची नजर मुख्यमंत्रीपदावर आहे. त्यातच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनाला देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी ‘सामना’तून दावा आणि इशारा एकाचवेळी देण्यात आला आहे. सवाल हाच आहे की, दबाव टाकून मुख्यमंत्रिपद मिळणार का?

शिवसेनेनं पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरुन डरकाळी फोडली आहे. 53 व्या वर्धापनदिनाला सामनातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा केला आहे. भाजपलाच इशारा देण्यात आला आहे.

‘सामना’त नेमकं काय म्हटलं आहे? 

“शिवसेनेच्या राजकारणात, समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारु शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरुर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करुन सोडू आणि शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया” असं सामनात म्हटलं आहे.

तशी चर्चा तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीपासूनच रंगू लागली होती. त्यासाठी अमित शाह-उद्धव ठाकरेंच्या बैठकीत ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याचा दाखला शिवसेनेकडून देण्यात येत आहे.

जागा वाटपाबद्दल फिफ्टी फिफ्टीची जशी घोषणा झाली आहे, तसं मुख्यमंत्रीपदावरुन स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यातच शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याच्या मूडमध्ये भाजप नाही. मात्र शिवसेनेकडून सुरु असेलल्या दाव्यानंतर सवालही अनेक आहेत.

  • ज्याच्या अधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला शिवसेनेला का मान्य नाही?
  • भाजपपेक्षा कमी आमदार निवडून येतील, अशी शिवसेनेला भीती आहे का?
  • आधीच फॉर्म्युला ठरवल्यास अडीच वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळेल असं शिवसेनेला वाटतं?
  • युतीचा फायदा भाजपलाच मिळतोय, अशी शिवसेनेची भावना आहे का?

वास्तव तर हे आहे की, भाजप सध्या शिवसेनेला अधिक भाव देताना दिसत नाही. केंद्रातही एकच मंत्रीपद मिळालं आहे आणि लोकसभेचं उपाध्यक्षपदही मिळणार नसल्याचंच दिसत आहे. आता मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कसं पूर्ण होईल, हेही येत्या काळात कळेलच.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.