मीरा भाईंदर महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचा राडा, स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड

मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

मीरा भाईंदर महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचा राडा, स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड
Follow us
| Updated on: Sep 17, 2019 | 3:05 PM

मीरा भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधला (Mira Bhayandar Shivsena Ruckus) वाद चांगलाच उफाळून आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनावरुन झालेल्या वादानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड केली.

मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा (Mira Bhayandar Shivsena Ruckus) घेतला.

मीरा-भाईंदर महापालिकेत मंगळवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही शेवटची बैठक असल्याच्या शक्यतेमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचा विषय पटलावर घेण्याची शिवसेना नगरसेवकांची मागणी होती. मात्र महापौरांनी दुर्लक्ष केल्यामुळे सेना नगरसेवकांचा संताप झाला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर महापौरांनी सभा तहकूब केली. त्यानंतर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

युतीत तणाव, पुण्यात सर्वच्या सर्व भाजपचे आमदार, मग शिवसेनेला जागा कशा मिळणार?

शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. महापौर कार्यालय आणि स्थायी समितीच्या सभागृहाचीही तोडफोड शिवसेना नगरसेवकांनी केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. राज्यात युती झाली तरी मीरा-भाईंदरमध्ये युती होणार नाही, अशा घोषणाही यावेळी शिवसेना नगरसेवकांनी दिल्याचं म्हटलं जातं.

मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपचे 61 तर शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. मीरा भाईंदरमधील वादाच्या अंकावर कधी पडदा पडणार, आणि तो न पडल्यास विधानसभेवर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.