शिवसेनेने 'मलबार हिल'ला नवं नाव सूचवलं!

मुंबई: शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याचे पडसाद आता मुंबईत दिसू लागले आहेत. कारण एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे.  मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही …

शिवसेनेने 'मलबार हिल'ला नवं नाव सूचवलं!

मुंबई: शिवसेनेचा आयोध्या दौऱ्याचे पडसाद आता मुंबईत दिसू लागले आहेत. कारण एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामकरण प्रभादेवी केल्यानंतर आता लवकरच मलबार हिलचेही बारसे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू लोकवस्ती भागाचे नामकरण रामनगरी असे करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे करण्यात आली आहे.  मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुधार समितीचे अध्यक्षपदही मिळवणारे दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे.

मलबार हिल हे नाव ब्रिटिश काळापासून उच्चारले जाते. मात्र मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनाही या भागाची भुरळ पडली. त्यांनीही या भागात काही काळ वास्तव्य केल्याचे बोलले जाते.  त्यामुळे मलबार हिलचे नाव बदलून ‘रामनगरी’ करावे, अशी मागणी त्यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

अशा प्रकारची नामकरण करण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ब्रिटिश काळातील नावे बदलण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यानंतर आता मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरूपात पुढे आली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मलबार हिलचं नाव बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दादर स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी

दरम्यान, नुकतंच मुंबईतील दादर स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी भीम आर्मीने केली होती. दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी भीम आर्मीची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीने हा इशारा दिला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *