जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भीषण हल्ला, मुंबईत विद्यार्थी संघटना रस्त्यावर

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (6 जानेवारी) मुंबईमध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक (Student union protest against ABVP)  झाल्या आहेत.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भीषण हल्ला, मुंबईत विद्यार्थी संघटना रस्त्यावर

मुंबई : जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (6 जानेवारी) मुंबईमध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक (Student union protest against ABVP)  झाल्या आहेत. काल (5 जानेवारी) रात्री पासूनच मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर हजारो विद्यार्थींनी हल्लाबोल आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सुरू असतानाच आज दुपारी भाजप कार्यालयावर आणि क्रांती चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. क्रांती चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत लाँग मार्चही (Student union protest against ABVP)  काढला.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली त्या विरोधात मुंबईत मोठ्या संख्येने विध्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आरएसएस, एबीव्हीपी, भाजपाकडून देशात हुकूमशाही सुरू आहे. मोदी-शाहकडून देश धोक्यात आला आहे. देशात विद्यार्थ्यांना मारहाण होते. त्यांचा आवाज दाबला जात आहे. ही हुकूमशाही आम्ही चालू देणार नाहीत. देशातील न्याय व्यवस्थेने तरी न्याय मिळवून द्यावा. आम्हाला आझादी पाहिजे, अशी मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली.

जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर जैसा मरेगा, इस देश को बाचाने निकले है आओ हमारे साथ चाले, आरएसएस, एबीव्हीपी, भाजपची दादागिरी चालू देणार नाही, भारतीय संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, मोदी सरकार जिंदाबाद, हमारी एकता जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या.

जोपर्यंत दादागिरी थांबणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असा पवित्राही विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारी सुवर्णा साळवे आणि माजी न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटीलही या आंदोलनात उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *